PHOTOS : नेटकरी धनुषच्या ‘बहिणी’वर फिदा , कोण आहे ही ग्लॅमर गर्ल?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 05:02 PM2022-03-11T17:02:17+5:302022-03-11T17:11:51+5:30

Dhanush In Maaran Movie : साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘मारन’ हा नवा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. या चित्रपटात धनुषसह मालविका मोहन, स्मृती वेंकट, कृष्ण कुमार असे अनेक स्टार आहेत. पण चर्चा आहे ती धनुषच्या बहिणीची...

साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘मारन’ हा नवा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. दिग्दर्शक कार्तिक नरेन यांच्या या चित्रपटात धनुषसह मालविका मोहन, स्मृती वेंकट, कृष्ण कुमार असे अनेक स्टार आहेत. पण चर्चा आहे ती धनुषच्या बहिणीची.

होय, या चित्रपटात धनुषच्या बहिणीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती वेंकट हिची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. आता ही धनुषची ऑनस्क्रीन बहिण कोण आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्मृती वेंकट ही तामिळ फिल्म इंडस्ट्रीचा लोकप्रिय चेहरा आहे. 2019 मध्ये तिचा डेब्यू झाला आणि बघता बघता ती लोकप्रिय झाली. मारन या चित्रपटात तिने धनुषची बहीण चित्तीची भूमिका साकारली आहे.

2020 मध्ये तिचा Mookuthi Amman हा सिनेमा रिलीज झाला. ओटीटीवर रिलीज झालेल्या या सिनेमातील स्मृतीच्या अभिनयाचंही जोरदार कौतुक झालं.

पुढच्याच वर्षी म्हणजे 2021 मध्ये Vanam आणि Theerpugal Virkapadum या सिनेमात तिची वर्णी लागली.

स्मृती सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे अनेक व्हिडीओ,रिल्स, फोटो ती शेअर करत असते.

9 जानेवारी 1994 मध्ये जन्मलेली स्मृती तामिळनाडूची आहे. चेन्नईत तिने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

स्मृतीकडे सध्या अनेक प्रोजेक्ट आहेत. सध्या ती मारनच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. सोशल मीडियावरही तिची हवा आहे.