'राधे माँ'चा मुलगा बॉलीवूड हिरोंपेक्षा कमी नाही, 'इन्स्पेक्टर अविनाश'मधून करतोय पदार्पण; पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 05:06 PM2022-03-30T17:06:44+5:302022-03-30T17:21:31+5:30

'राधे माँ'चे जगभरात लाखो भक्त आहेत. पण फार कमी लोकांना माहित असेल की राधे माँला एक मुलगा देखील आहे, जो काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दिसला आहे.

'राधे माँ'च्या ओळखीची खरंतर काही गरज नाही. कारण त्यांचे लाखो फॉलोअर्स आज जगभरात आहेत. पण फार कमी लोकांना माहित असेल की राधे माँला एक मुलगा देखील आहे, जो काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील दिसला आहे.

'ड्रीम गर्ल' आणि 'आय अॅम बनी' सारख्या चित्रपटात त्यानं काम केलं आहे. 'राधे माँ'च्या मुलाचं नाव हरजिंदर सिंग आहे आणि 'इन्स्पेक्टर अविनाश' ही रणदीप हुड्डासोबतची त्याची आगामी वेब सीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. जेव्हापासून लोकांना याची माहिती मिळाली तेव्हापासून ते हरजिंदरला वेब सीरिजमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

राधे माँचा मुलगा हरजिंदर सिंग याने नुकतीच एक मुलाखत दिली, ज्यात त्याला लहानपणापासूनच क्रिकेटर किंवा अभिनेता बनायचं होतं, असं तो म्हणाला होता.

"मला फक्त दोनच छंद होते. एकतर क्रिकेटर व्हायचं होतं किंवा अभिनेता. मला जितकं माहीत आहे, क्रिकेटरचं एक वय असतं. एक काळ असा होता की अभिनयालाही वय असायचं, पण आता तसं नाही. आता तुम्हीली कॅमेर्‍यासमोर येऊ शकता", असं तो म्हणाला.

"मी एमआयटी पुणे येथून शिक्षण घेतलं आहे. तिथं जे काही कार्यक्रम व्हायचे, त्यात मी आवर्जून भाग घ्यायचो. तिथूनच हळूहळू मला अभिनयात आवड निर्माण झाली. मला हे देखील समजलं की स्टेजवर आल्याने मला आनंद होतो", असंही त्यानं सांगितलं.

रणदीप हुड्डासोबत काम करण्याचा अनुभवाबद्दल देखील हरजिंदरनं सांगितलं. "रणदीपसोबत काम करण्याचा अनुभव खूप छान होता. एक अभिनेता म्हणून मला तो खूप आवडतो", असं तो म्हणाला.

"मी लखनौमध्ये झालेल्या शूटिंगमध्ये त्याला सांगितलं होतं की, मी अनेकदा फक्त रणदीप चित्रपटात आहे म्हणून मी तो चित्रपट पाहायला गेलो होतो", असंही तो पुढे म्हणाला.

आणखी काही मोठे प्रोजेक्ट आपल्याकडे आहेत पण त्याबद्दल आताच काही बोलणं खूप घाईचं ठरेल, असं हरजिंदर म्हणाला.