'शोले'तील गब्बरच्या लेकीला पाहिलंत का?, ती आहे या क्षेत्रात कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 06:11 PM2022-06-23T18:11:32+5:302022-06-23T18:15:06+5:30

Amjad Khan Daughter : आज आम्ही तुम्हाला अमजद खान यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या सुंदर मुलगी अहलम खानबद्दल सांगणार आहोत.

'सो जाओ वरना गब्बर आ जाएगा' हा डायलॉग जेवढा प्रसिद्ध आहे त्याहून जास्त लोकप्रिय आहे गब्बरचं पात्र. गब्बरची भूमिका अभिनेते अमजद खान यांनी निभावली होती. शोलेमध्ये अमजद खान यांनी गब्बरची भूमिका उत्तमरित्या वठवली होती.

आजही लोक कोणाला घाबरवण्यासाठी गब्बरचं नाव घेतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अमजद खान यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या सुंदर मुलगी अहलम खानबद्दल सांगणार आहोत.

२० वर्षांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत १३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अमजद खान यांच्या मुलांबद्दल फारसे माहिती नाही. अमजद खान यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी तीन मुले होती. अहलम खान असं त्यांच्या मुलीचं नाव आहे.

अमजद खान यांची मुलगी अहलम खान कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही.

अहलमचे सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल की ती चित्रपटांमध्ये का दिसत नाही. खरं तर अहलम ही देखील तिच्या वडिलांप्रमाणेच कलाकार आहे. तिलादेखील वडिलांप्रमाणे अभिनयाची आवड आहे.

अहलम खाननेही चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या ती रंगभूमीच्या माध्यमातून अभिनयाशी जोडली गेली आहे. ती २००५ मध्ये 'रिफ्लेक्शन' नावाच्या चित्रपटात दिसली होती. 'रिफ्लेक्शन' हा मल्याळी सुपरस्टार मोहनलाल यांचा लघुपट होता. पुढे त्यांनी मकरंद देशपांडे यांच्या चित्रपटातही काम केले.

२०११ मध्ये अहलमने थिएटर कलाकार जफर कराचीवालासोबत लग्न केले. लग्नानंतर दोघांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये फक्त कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

अहलम खान ही सध्या थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करत आहे.

आजच्या युगातही ती लाइम लाईट आणि सोशल मीडियापासून दूर आहे. तिची इन्स्टाग्राम आणि फेसबुक दोन्ही अकाउंट खाजगी आहेत. त्यामुळे सुंदर दिसणाऱ्या अहलमची इंटरनेटवर कमी फोटो पाहायला मिळतात.