कोण आहे 'ही' प्रसिद्ध डान्सर; अभिनेत्रींपेक्षाही दिसते सुंदर, पाहा फोटो !

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:38 PM2022-11-29T17:38:16+5:302022-11-29T17:43:18+5:30

बॉलिवुडमध्ये एकापेक्षा एक सुंदर अभिनेत्री आहेत. मात्र केवळ अभिनेत्रीच नाहीत तर गायिका आणि डान्सर ही दिसायला तितक्याच सुंदर आहेत. अभिनेत्रींइतकेच त्यांचेही फॅन्स आहेत. हिंदी डान्सर मध्ये एक असे नाव आहे ते म्हणजे 'शक्ती मोहन'. तिने इन्स्टाग्रामवर टाकलेले फोटो पाहून चाहते फिदाच झालेत.

शक्ती मोहन ही आघाडीची नृत्यांगना आहे. शक्ती लहानपणीपासूनच नृत्यात पारंगत आहे. तिला आणखी तीन बहिणी आहेत. त्यापैकी एक नीती मोहन ही गायिका आहे.

शक्ती मोहन ही रिएलिटी शो डान्स इंडिया डान्स सीझन २ ची विजेता आहे. तर सध्या ती डान्स प्लस ची जज आहे.

शक्तीने इन्स्टाग्रामवर समुद्रकिनारी साडीतील फोटो अपलोड केले आहेत. ते पाहून फॅन्स सुंदर असे कमेंडही करत आहेत.

शक्ती रणबीर कपूरच्या शमशेरा मध्ये नृत्यदिग्दर्शिका होती. तर ऑंख लड जावे नृत्य जॅम, कान्हा रे, आखिरी बार, द छमिया सॉंग, सातो जनम आणि कमली या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले आहे.

शक्तीने नृत्यशक्ती हे ब्रॅंड सुरु केले आहे, तसेच ब्रेक अ लेग या युट्युब वेब सीरीज मध्येही तिने काम केले आहे. शक्तीचे सौंदर्य अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. तिची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे.