तनुश्री दत्ता ते मल्लिका शेरावत, बोल्डनेस दाखवूनही चित्रपटसृष्टीत टिकू शकल्या नाहीत 'या' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 07:15 PM2024-02-22T19:15:19+5:302024-02-22T19:43:36+5:30

बोल्ड भुमिका घेऊनही त्यांच्या हाती यश लागले नाही.

बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये मल्लिका शेरावतचे नाव घेतले जाते, चित्रपटांमध्ये बोल्डनेस असूनही मल्लिका शेरावतचे करिअर प्रगती करू शकले नाही.

जहर आणि अक्सर सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उदिता गोस्वामीही लग्नानंतर रातोरात इंडस्ट्रीतून गायब झाली.

बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असलेल्या नेहा धुपियाला चित्रपटसृष्टीत फारशी ओळख मिळालेली नाही.

अभिनेत्री समीरा रेड्डीने एकेकाळी तिच्या बोल्डनेसने इंडस्ट्रीत स्वत:चे नाव कमावले होते, त्यानंतरही समीराला बॉलिवूडमध्ये यश मिळवता आले नाही.

'आशिक बनाया आपने' या चित्रपटात आपला हॉटनेस दाखवून प्रसिद्ध झालेल्या बोल्ड अभिनेत्री तनुश्री दत्ताची कारकीर्दही काही खास राहिली नाही.

सेलिना जेटली ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे, चित्रपटांमध्ये बोल्ड सीन्स देऊनही सेलिना इंडस्ट्रीत टिकू शकली नाही.

अभिनेत्री ईशा गुप्ताने चित्रपटाच्या पडद्यावर तिच्या बोल्ड स्टाईलने बरेच लक्ष वेधून घेतले, ईशा आता फार कमी चित्रपटांमध्ये दिसते.

आपल्या अप्रतिम डान्स नंबर आणि हॉटनेससाठी प्रसिद्ध असलेली बॉलीवूड अभिनेत्री कोएना मित्रा देखील चित्रपटसृष्टीतून पूर्णपणे गायब झाली आहे.

शर्लिन चोप्रा ही खूप बोल्ड अभिनेत्री आहे. पण, तिची कारकीर्दही काही विशेष राहिली नाही.

सलमान खानच्या 'वीर' या पहिल्या चित्रपटातून बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या जरीन खानला फार कमी पसंती मिळाली. बॉलिवूडच्या फ्लॉप अभिनेत्रींमध्ये जरीन खानचे नाव येते.