Photos: स्ट्रगलला कंटाळली होती, इरफान खानने काढली समजूत; आज आहे प्रभावशाली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 04:23 PM2023-11-01T16:23:41+5:302023-11-01T16:37:23+5:30

बॉलिवूड अभिनेत्रीचा आज ५० वा वाढदिवस आहे

फिल्म आणि वेबसिरीजमधून आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवणारी टिस्का चोप्रा (Tisca Chopra) आज ५० वा वाढदिवस साजरा करत आहे. 'तारे जमीन पर' मध्ये ईशानच्या आईच्या भूमिकेमुळे तिला जास्त लोकप्रियता मिळाली होती.

टिस्काचं खरं नाव प्रिया असं होतं. मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी तिने नाव बदलून टिस्का केलं. याबाबत तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता.

टिस्काच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं तर तिने 1997 साली एअर इंडियाचे पायलट संजय चोप्रा यांच्याशी लग्न केले. दोघंही एका कॉमन फ्रेंडमुळे भेटले होते. त्यांच्यात मैत्री झाली आणि हळूहळू ते प्रेमात पडले.

टिस्का चोप्रा स्वत: एक लेखिकाही आहे. अभिनेता इरफान खानसोबत तिने 'किस्सा' या सिनेमात भूमिका साकारली होती. आपल्या स्ट्रगलविषयी बोलताना टिस्का म्हणाली होती,'मी ९० च्या दशकात स्ट्रगल करत होते. यश मिळत नसल्याने मी निराश झाले होते. मी अभिनयच सोडणार होते.'

' तेव्हा इरफान खानने मला समजावलं आणि गट्स दाखवून हिंमतीने प्रयत्न करत राहायची समज दिली.'

टिस्काने १९९३ साली '१५ ऑगस्ट','प्लॅटफॉर्म' आणि 'आय लव इंडिया'(तमिळ) या सिनेमात काम केले होते. हा तिचा स्ट्रगलचा काळ होता.

टिस्कालाही कास्टिंग काऊचचा अनुभव येणार होता. एका दिग्दर्शकाने तिला खोलीत बोलवले होते. मात्र त्याआधीच अभिनेत्रीने तिला येणारे सगळे कॉल्स दिग्दर्शकाच्या रुममध्ये ट्रान्सफर करायला सांगितले होते. १५ मिनिटात बरेच फोन आल्याने दिग्दर्शकाने स्वत:हूनच तिला बाहेर पाठवलं. प्लॅन रिस्की होता पण गरजेचा होता असं ती म्हणाली होती.

टिस्काला एक मुलगी आहे जिचं नाव तारा असं आहे. तारा चोप्रा काही सरकारी संस्थांसोबत काम करते. महिला, शिक्षण आणि त्यांच्या अधिकारांच्या समर्थनासाठी ती झगडते.