"त्यांच्याहून सुंदर कोणीच नाही..."; नवाजुद्दीन सिद्दीकीने 'या' मराठी अभिनेत्रीचं केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 13:08 IST2026-04-27T12:59:03+5:302026-04-27T13:08:22+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. नवाजुद्दीने गेली अनेक वर्ष त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूडवर छाप सोडली आहे. अशातच नवाजुद्दीनने एका मराठी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता. नवाजुद्दीने गेली अनेक वर्ष त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूडवर छाप सोडली आहे. अशातच नवाजुद्दीनने एका मराठी अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे.

ही अभिनेत्री आहे स्मिता पाटील. नवाजुद्दीन सिद्दीकीने नुकत्याच एका मुलाखतीत बॉलिवूडमध्ये असलेल्या वर्णभेदावर भाष्य केलं. याशिवाय अभिनेत्री स्मिता पाटील यांची आठवण जागवत त्यांचं कौतुक केलं.

झूमला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीन सिद्दीकीने याविषयी खुलासा केला. ''स्मिता पाटील यांच्याहुन जास्त सुंदर मी आजवर कोणाला पाहिलं नाही'', अशा शब्दांत नवाजुद्दीनने स्मिता पाटील यांचं कौतुक केलं.

''कॅमेरासमोर त्यांच्याहून जास्त सुंदर मी आजवर कोणालाच पाहिलं नाही. कॅमेराची स्वतःची एक वेगळी भाषा आहे. कॅमेरासमोर खरं सौंदर्य झळकतं'', असंही नवाजुद्दीन म्हणाला.

''सौंदर्य आणि कलाकारांबद्दल जो विचार करण्यात येते तो खूपदा कथेच्या दृष्टीकोनातून होतो. ती व्यक्तिरेखा कशी दिसेल, हे खूप आधीच निश्चित केलं जातं'', असंही नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला.

नवाजुद्दीन पुढे म्हणाला, ''लोकांचे स्वतःचे विचार असतात. परंतु त्या विचारांना तुम्ही व्यवस्थेत टाकू नका. जर एखादी मुलगी तुमच्या विचारात बसत नसेल, तर तिला सिनेमात घ्यायचं नाही, हे चुकीचं आहे.''

''सध्या कथाच अशा बनवल्या जातात की कोणाला दोष देण्यात अर्थ नाही. गोऱ्या मुलींना डोळ्यांसमोर ठेऊन कथांची निर्मिती केली जाते. अनेकजण याच गोष्टींशी संघर्ष करत आहेत'', असंही नवाजुद्दीन म्हणाला.

















