'भाभी 2' सुसाट... 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी चा 'रेड हॉट' लूक! (Photos)

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2023 23:35 IST2023-12-18T23:24:56+5:302023-12-18T23:35:45+5:30

रणबीर-रश्मिका स्टारर 'अ‍ॅनिमल'मध्ये तृत्पीच्या अभिनयाचं झालं कौतुक

Triptii Dimri Red Hot Look : रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेल्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटा पासून तृप्ती डिमरी तुफान चर्चेत आहे.

तृत्पीने या चित्रपटात रणबीर कपूरची गर्लफ्रेंड झोया हिची भूमिका केली असून तिला 'भाभी 2' या नावानेही तरुणाईत ओळख मिळाली आहे

चित्रपटातील झोयाची भूमिका छोटी असली तरी यात तिने केलेला अभिनय आणि काही इंटिमेट हॉट सीन यामुळे ती चांगलाच भाव खाऊन गेली.

रिल लाइफ मधील हॉटनेस तिने रियल लाइफ मध्येही कायम ठेवल्याचे दिसत आहे. तृत्पीचे नुकतेच झालेले फोटोशूट सध्या चर्चेत आहे.

तृत्पीने या फोटोशूटमध्ये लाल रंगाचा डीपनेक गाऊन परिधान केला आहे. या ड्रेसमध्ये ती कमालीची हॉट आणि तितकीच सुंदर दिसत आहे.

तृत्पीच्या या तुफान बोल्ड अँड बिनधास्त फोटोशूटला चाहत्यांनीही भरपूर पसंती दाखवली असून तिच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. (सर्व फोटो- तृत्पी डिमरी इन्स्टाग्राम)