मराठी अभिनेत्रींनी गाजवलं बॉलिवूड! अमृता ते सईच्या बोल्ड सीन्सने अनेकांच्या भुवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 12:01 PM2023-07-11T12:01:27+5:302023-07-11T12:25:32+5:30

मराठी अभिनेत्रींनी इंटिमेट सीन्स दिले की जास्तच चर्चा होते. कोणी कोणी साकारल्यात बोल्ड भूमिका बघा.

एखाद्या चित्रपटात किंवा वेबसिरीजमध्ये बोल्ड सीन्स असणं काही नवीन नाही. कथेचा भाग म्हणून कलाकारांना इंटिमेट सीन्स करावे लागतात. मात्र अजूनही सेलिब्रिटींना त्यावरुन ट्रोल करणं काही कमी झालेलं नाही. त्यात जर एखाद्या मराठी अभिनेत्रीने बोल्ड सीन्स केले असतील तर मात्र प्रेक्षकांच्या भुवयाच उंचावतात.

दरम्यान सध्या अमृता सुभाष, प्रिया बापटसह काही मराठी अभिनेत्री इंटिमेट सीन्स केल्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी असे सीन्स करणं अनेकांच्या डोळ्यात खुपलंय. त्यावरुन अभिनेत्रींना बरंच काही ऐकून घ्यावं लागलं आहे. यावर प्रिया बापटने स्पष्ट शब्दात ट्रोलर्सची काउघाडणीही केली. मराठी अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा तर उमटवलाच पण इंटिमेट सीन्स करायलाही घाबरल्या नाहीत. कोण आहेत या अभिनेत्री बघा

चार दिग्दर्शकांनी मिळून बनवलेला 'लस्ट स्टोरीज 2' नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये कोंकणा सेन शर्माने दिग्दर्शित केलेली 'द मिरर' गोष्ट प्रेक्षकांना खूपच आवडली. यात अमृता सुभाषने (Amruta Subhash)महत्वाची भूमिका साकारली आहे. यात तिने अभिनेते श्रीकांत यादव यांच्यासोबत लिपलॉक सीन्स केले आहेत. अमृताने याआधी सेक्रेड गेम्स सिरीजमध्ये इंटिमेट सीन्स केले होते.

'सिटी ऑफ ड्रीम्स' या हॉटस्टारवरील लोकप्रिय सिरीजचा भाग ३ नुकताच प्रदर्शित झाला. पॉलिटिकल ड्रामा असलेल्या या सिरीजमध्ये प्रिया बापटच्या (Priya Bapat) भूमिकेचं खूप कौतुक होतंय. सिरीजच्या पहिल्याच भागात प्रियाने एक ते दीड मिनिटांचा शॉट दिला होता ज्यात तिचा महिलेसोबत लिपलॉक करतानाचा सीन आहे. हा सीन पाहून प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

सई ताम्हणकर (Saie Tamhankar) बोल्ड अँड बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 2015 साली आलेल्या हंटर सिनेमात सईने केलेला इंटिमेट सीन चर्चेत होता. यानंतरही तिने अनेक वेबसिरीज आणि चित्रपटांमध्ये बोल्ड दृश्ये दिली.'क्राईम बीट' या वेबसिरीजमध्ये तिने लेस्बियन किसींग सीन देत सर्वांना धक्का दिला होता.

मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) कायमच तिच्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत राहिली आहे. 'द वेडिंग गेस्ट' 'पार्च्ड','मेडली:लव्ह इज मॅड', 'हंटर' या सारख्या काही प्रोजेक्ट्समध्ये तिने बोल्ड सीन्स केलेत.

अभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आहे. सीतारामम सिनेमात तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. नुकत्याच रिलीज झालेल्या लस्ट स्टोरीज 2 सिनेमात तिने अंगद बेदीसोबत इंटिमेट सीन्स केले. तसंच याआधी घोस्ट स्टोरीज सिनेमात तिने केलेल्या इंटिमेट सीनची चर्चा झाली होती.

रितेश देशमुखच्या 'लय भारी' सिनेमातून पदार्पण करणारी अभिनेत्री आदिती पोहनकरने (Aditi Pohankar) हिंदी वेबसिरीज 'she' मध्ये दिलेले सेक्स सीन्स पाहून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं.