PHOTOS : आमिरनं केलं कलश पूजन, एक्स-वाईफ किरण रावसोबत केली आरती, काय आहे प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 12:56 PM2022-12-09T12:56:54+5:302022-12-09T15:05:00+5:30

Aamir Khan Performs Kalash Puja : ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने काही काळ ब्रेक घेतला आहे. तूर्तास आमिर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने काही काळ ब्रेक घेतला आहे. तूर्तास आमिर एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे.

होय, आमिरच्या कलश पूजेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आमिरच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये नुकतीच ही कलश पूजा झाली.

‘लाल सिंग चड्ढा’चे दिग्दर्शक अद्वैत चंदनने आमिरच्या कलश पूजेचे काही फोटो शेअर केले आहेत. यात आमिर पूजा करताना दिसतोय.

आमिर आणि त्याची एक्स वाईफ किरण राव यांच्यासोबत आमिर खान प्रोडक्शन्सच्या स्टाफ मेंबर्सनं देखील या पूजेला हजेरी लावली. या फोटोला अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

हिंदू पद्धतीने आमिर खानने अगदी विधीवत पूजा केली. यावेळी त्याने डोक्यावर टोपी घातली होती. गळ्यात उपरणं असा त्याचा लुक होता.

यावेळी आमिर खान आणि त्याची एक्स वाईफ किरण राव यांनी एकत्र आरती देखील केली. दोघंही आरती करताना फोटोत दिसत आहेत.

आमिर व किरणचे एकत्र पूजा अर्चा करतानाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आमिर काय नवं सुरू करतोय? हे जाणून घेण्याची उत्सुकताही आहेच.

यावेळी आमिर व अद्वैतच्या टीमचे अनेक लोक पूजेत सामील झालेले दिसले. आमिर लवरकच एका प्रोजेक्टवर काम सुरू करणार असल्याचं मानलं जात आहे.