इतर माध्यमात यश मिळताच टीव्ही इंडस्ट्रीला केलं बाय बाय, मराठमोळ्या अभिनेत्रीने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 05:40 PM2024-05-23T17:40:26+5:302024-05-23T17:49:38+5:30

सौदी अरेबियात जन्मलेली ही मराठमोळी अभिनेत्री सध्या हिंदी कलाविश्वात डंका गाजवत आहे.

'बिग बॉस' या रिएलिटी शोने अनेक कलाकारांना प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवलं. काहींचं नशीब पालटलं तर काही मात्र गायब झाले. आता नुकतंच एका अभिनेत्रीने यश मिळताच टीव्ही इंडस्ट्रीलाच बाय बाय केलंय.

ही अभिनेत्री मूळ मराठी असून सध्या हिंदी कलाविश्वात डंका गाजवत आहे. इतकंच नाही तर तिने 'बिग बॉस 15' चं विजेतेपदही पटकावलं. यानंतर ती 'खतरो के खिलाडी'मध्येही झळकली. शिवाय तिने 2 मराठी चित्रपटही केले.

ही अभिनेत्री आहे तेजस्वी प्रकाश. तेजस्वीने २०१२ साली म्हणजेच १२ वर्षांपूर्वी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. तेव्हापासून तेजस्वी काम करत आहे.

पण तिला खरी लोकप्रियता 'बिग बॉस 15' मुळेच जास्त लोकप्रियता मिळाली तेजस्वीने आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. टीव्ही इंडस्ट्रीतून ब्रेक घेतल्याचं तिने म्हटलं आहे.

नुकतंच एका मुलाखतीत तेजस्वी म्हणाली, 'मी सध्या काही काळासाठी टीव्ही इंडस्ट्रीत काम करणार नाही. याचा अर्थ मी कधीच करणार नाही असं नाही. आज मी जे काही आहे ते टीव्हीमुळेच. पण आता दुसऱ्या माध्यमातही काम करणं करिअरसाठी गरजेचं आहे. म्हणूनच मी टीव्हीतून ब्रेक घेत आहे.'

इतर लोकांनी केलं आहे मग मीही करु शकते असा मला विश्वास आहे. यासाठी नक्कीच वेळ लागेल पण हे असंभव नाही. मला सर्व माध्यमांमध्ये काम करायचंय. कधीही नाही म्हणायचं नाही हेच मी शिकले आहे.

तेजस्वीने 'मन कस्तुरी रे' आणि 'स्कूल कॉलेज आणि लाइफ' या मराठी सिनेमात काम केलं. आता लवकरच ती ओटीटी माध्यमांमध्ये दिसू शकते.