पतीला अद्दल घडवायला 'या' अभिनेत्रीने ठेवले विवाहबाह्य संबंध, मग झालं असं काही की..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 09:23 AM2023-04-18T09:23:48+5:302023-04-18T10:25:34+5:30

अभिनेत्री आणि त्यांचं वैयक्तिक आयुष्य कायमच चर्चेत असतं

बॉलिवूड कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य पडद्यावरील आयुष्यासारखंच नाट्यमय असतं. ब्रेकअप, विवाहबाह्य संबंध, व्यसनं,अकस्मात मृत्यू असे अनेक किस्से आपण या तारेतारकांचे ऐकले आहेत.

असाच एक किस्सा आहे अभिनेत्री पूनम ढिल्लोचा (Poonam Dhillon). आज पूनम ढिल्लो यांचा वाढदिवस. त्या 61 वर्षांच्या झाल्या आहेत मात्र आजही त्यांच्या सौंदर्याने भलेभले घायाळ होतील.

असं म्हणलं जातं पूनम ढिल्लो यांनीच बॉलिवूडमध्ये व्हॅनिटी व्हॅन आणल्या. एकदा त्या त्यांचा मित्र जगमोहन मुद्रा यांना भेटण्यासाठी लॉस एंजिलिस येथे गेल्या होत्या. तिथे त्यांनी व्हॅनिटी व्हॅन पाहिली. नंतर पूनम भारतात आल्या आणि त्यांनी 25 व्हॅनिटी व्हॅन बनवून घेतल्या. आज आता जवळपास सगळ्याच कलाकारांकडे आलिशान व्हॅनिटी व्हॅन आहेत.

अभिनेत्री पूनम ढिल्लो यांनी 1978 मध्ये 'मिस यंग इंडिया' चा खिताब पटकावला. यानंतर यश चोप्रांनी 'त्रिशूल' सिनेमात त्यांना ब्रेक दिला. या फिल्ममुळे पूनम ढिल्लो रातोरात स्टार झाल्या. १६ व्या वर्षी आपल्या पहिल्याच सिनेमात त्यांनी स्विमसूटमध्ये सीन दिला होता.

पूनम ढिल्लो यांनी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले.'त्रिशूल','काला पत्थर','नुरी' हे त्यातील काही सर्वात जास्त गाजलेले चित्रपट. करिअरमध्ये यशाच्या शिखरावर असलेल्या पूनम ढिल्लो प्रेमात मात्र यशस्वी झाल्या नाहीत. ब्रेकअप नंतर लग्न, विवाहबाह्य संबंध आणि घटस्फोट असं काहीसं त्यांचं आयुष्य राहिलं आहे.

दिग्दर्शक रमेश तलवार यांच्याशी पूनम यांचं नाव जोडलं गेलं होतं. 'नुरी' सिनेमाच्या वेळी त्यांच्यातील अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दोघं लिव्ह इन मध्ये राहात होते असंही बोललं गेलं. मात्र त्यांना प्रेमात धोका मिळाला आणि हे नातं संपुष्टात आलं.

1988 मध्ये पूनम यांनी निर्माते अशोक ठकेरिया यांच्याशी लग्न केलं. त्यांना दोन मुलंही झाली. मात्र 1997 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. या घटस्फोटाला कारण ठरलं ते अशोक ठकेरिया यांचे विवाहबाह्य संबंध.

पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत हे समजताच पूनम यांनी पतीला धडा शिकवायचं ठरवलं. दरम्यान त्यांनीही विवाहबाह्य संबंध ठेवले. मात्र तरी त्यांचं लग्न काही टिकलंच नाही. शेवटी लग्नानंतर 9 वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. त्यांची दोन्ही मुलं पूनम यांच्यासोबत राहू लागली.

2004 मध्ये पूनम यांनी राजकारणात यायचं ठरवलं. त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. 2018 मध्ये मुंबई भाजपाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली गेली. आजही त्या चित्रपटात छोट्या छोट्या भूमिका करतात.