आॅस्कर बॉय झळकणार मराठी सिनेमात

By Admin | Updated: March 3, 2017 02:53 IST2017-03-03T02:53:45+5:302017-03-03T02:53:45+5:30

मूर्ती लहान, पण कीर्ती महान अशी सनी पवारविषयी जगभरात चर्चा सुरू आहे.

The Oscar Boy will be seen in Marathi cinema | आॅस्कर बॉय झळकणार मराठी सिनेमात

आॅस्कर बॉय झळकणार मराठी सिनेमात


मूर्ती लहान, पण कीर्ती महान अशी सनी पवारविषयी जगभरात चर्चा सुरू आहे. 'लायन' सिनेमामुळे आॅस्करपर्यंत पोहोचलेल्या सनीने हॉलिवूडमध्येही आपल्या कौशल्याने रसिकांची मनं जिंकली. 'लायन' सिनेमानंतर 'लव्ह सोनिया' सिनेमातही तो झळकणार आहे. या सिनेमात फ्रिदा पिंटो आणि रिचा चढ्ढासह तो रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. विशेष म्हणजे, दोन मेगाप्रोजेक्टमध्ये काम केल्यानंतर मराठी सिनेमांकडेही वळणार असल्याचे कळतेय. सनीच्या कुटुंबानेही सनीने मराठी सिनेमातही झळकावे, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे हॉलिवूडपर्यंत मजल मारणारा सनी मराठी सिनेमातही काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे कळते आहे.

Web Title: The Oscar Boy will be seen in Marathi cinema