करण नव्हे, सलमान करणार सारा अली खानला लाँच

By Admin | Updated: May 9, 2017 12:34 IST2017-05-09T12:28:47+5:302017-05-09T12:34:17+5:30

मागील अनेक महिन्यांपासून छोटे नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत ब-याच चर्चा रंगल्या होत्या.

Not Salman, Salman Launches Sarah Ali Khan | करण नव्हे, सलमान करणार सारा अली खानला लाँच

करण नव्हे, सलमान करणार सारा अली खानला लाँच

tyle="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 9 - मागील अनेक महिन्यांपासून छोटे नवाब सैफ अली खानची मुलगी सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत ब-याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र  या सर्व चर्चांना आता लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार बॉलिवूडचा दबंग सलमान खान मेहुणा आयुष शर्मा आणि साराला एकत्र लाँच करणार आहे. 
 
या नव्या प्रोजेक्टबद्दल सलमान लवकरच साराशी चर्चा करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार साराने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली असून, ही एक प्रेमकथा आहे. करण जोहर साराला लाँच करणार असल्याची चर्चा होती पण यात तथ्य नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आयुष आणि साराची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर महिन्यात सुरु होईल अशीही ही चर्चा इंडस्ट्रीमध्ये रंगली आहे. 
 
चित्रपटाचे नाव, दिग्दर्शक यासंबंधी अद्याप काहीही ठरलेले नाही. सारा तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी सारा अली खान आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचा नातू वीर पाहरिया हे दोघे डेटिंग करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. 
 

Web Title: Not Salman, Salman Launches Sarah Ali Khan