​ अक्षयला करायचाय विमानातून प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2017 13:06 IST2017-01-01T13:06:51+5:302017-01-01T13:06:51+5:30

नवीन वर्षाची वाट सर्वजणच पाहत असतता. पार्टी, एंजॉयमेंट या सर्वांसोबतच आपण नवीन वर्षासाठी नवीन संकल्प देखील करीत असतो. असाच ...

Travel to the Aviation Airplane | ​ अक्षयला करायचाय विमानातून प्रवास

​ अक्षयला करायचाय विमानातून प्रवास

ीन वर्षाची वाट सर्वजणच पाहत असतता. पार्टी, एंजॉयमेंट या सर्वांसोबतच आपण नवीन वर्षासाठी नवीन संकल्प देखील करीत असतो. असाच संकल्प केला आहे अभिनेता अक्षय वाघमारे याने. अक्षय त्याच्या संकल्पाविषयी सांगतो, २०१६ हे वर्ष अखेरीस संपायला आलं आहे. वर्षाचा शेवटचा महिना म्हटलं की सगळीकडे जय्यत तैयारीच असते . जुन्या वषार्चा शेवटचा दिवस आणि येत्या नवीन वर्षाची उत्सुकता हि सर्वांनाच लागून राहिलेली असते . सगळीकडे ह्या दोन्ही गोष्टींचे सेलिब्रेशन चालू पण माझ्या बाबतीत म्हणाल तर गेले २५ वर्ष मी वर्षाचा  शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाचा  पहिला दिवस हा माज्या आई बाबांबरोबर साजरा करायचो. पण गेल्या वर्षापासून तितकं साजरं वगैरे करायला मिळत नाहीये, कारण मी कामाला माझं पहिलं प्राधान्य देतो. म्हणून गेल्या वषार्पासून मी वर्षाचा शेवटचा आणि वर्षाचा  पहिला दिवस काम करूनच साजारा करतोय. नवीन वर्षात मला खूप फिरायचं आहे, खास करून विमानाने प्रवास करायचा आहे. मी जास्त विमानाने फिरलो नसल्याने या वर्षी मी जयपूर, रशिया अशा ब-याच ठिकाणी जाणार आहे.
नव्या वर्षासाठी मी खूप जास्त उत्सुक आहे. माझे ३ सिनेमे येणार आहे. अमृता खानविलकर, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, अनिकेत विश्वासराव, रसिका सुनिल यांच्याबरोबर बस स्टॉप या सिनेमातून तर संस्कृती बालगुडे आणि भूषण प्रधान यांच्याबरोबर शिव्या या सिनेमातून आणि दोस्तीगिरी या यूथवर आधारित सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसेच मी विक्षिप्त भूमिका असलेलं खेळी-मेळी हे नाटक देखील करत आहे. यूथ या सिनेमातून प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं नवीन वर्षात सुद्धा तुमचं हे माज्यावरचं प्रेम असच राहू द्या.

Web Title: Travel to the Aviation Airplane