Video: सोनाली बेंद्रेला ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक, म्हणाली, “५० दिवस बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 11:13 AM2023-08-17T11:13:55+5:302023-08-17T11:14:42+5:30

सोनाली बेंद्रेने केलं ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Sonali Bendrela praised kedar shinde baipan bhari deva movie shared video | Video: सोनाली बेंद्रेला ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक, म्हणाली, “५० दिवस बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट...”

Video: सोनाली बेंद्रेला ‘बाईपण भारी देवा’चं कौतुक, म्हणाली, “५० दिवस बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट...”

googlenewsNext

‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट ३० जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला होता. काकडे सिस्टर्स या सहा बहि‍णींची अनोखी गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. तब्बल ५० दिवसांपासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. ब्लॉकबस्टर ठरलेल्या या मराठी चित्रपटाने बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेलाही भुरळ घातली आहे. सोनाली बेंद्रेने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या टीमबरोबर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला तिने “खरंच बाईपण लय भारी...ब्लॉकबस्टर”, असं कॅप्शन दिलं आहे. “५० दिवस झाले पण हा चित्रपट थिएटरमध्ये ठाण मांडून बसला आहे. कुठेही हलायचं नाव घेत नाहीये. श्रावण सुरू होतोय. मंगळागौरीचा चित्रपट आहे. केवळ स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीही सिनेमागृहात जाऊन हा चित्रपट बघणं गरजेचं आहे. मग वाट कसली पाहाताय...थिएटरमध्ये जा आणि चित्रपट बघा,” असं म्हणत सोनालीने ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बघण्याचं प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.

सोनालीने शेअर केलेल्या या व्हिडिओत तिच्याबरोबर दीपा परब, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर आणि केदार शिंदेही आहेत. तिच्या या व्हिडिओवर केदार शिंदेंनी कमेंटही केली आहे. “धन्यवाद”, असं म्हणत केदार शिंदेंनी सोनाली बेंद्रेचे आभार मानले आहेत.

‘बाईपण भारी देवा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने ५० दिवसांत ७६ कोटींचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटात दीपा परब, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, रोहिणी हट्टांगडी आणि सुकन्या मोने यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Web Title: Sonali Bendrela praised kedar shinde baipan bhari deva movie shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.