शाहीद कपूरच्या 'इश्क विश्क' सिनेमात झळकला सिद्धार्थ जाधव, म्हणाला- "मला चांगली भूमिका मिळणार होती, पण..."

By कोमल खांबे | Updated: April 29, 2026 15:37 IST2026-04-29T15:36:58+5:302026-04-29T15:37:39+5:30

शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क' सिनेमात झळकल्याचा खुलासाही प्रेक्षकांच्या लाडक्या सिद्धूने केला आहे. 

siddharth jadhav shared screen with shahid kapoor in ishq wishq movie song | शाहीद कपूरच्या 'इश्क विश्क' सिनेमात झळकला सिद्धार्थ जाधव, म्हणाला- "मला चांगली भूमिका मिळणार होती, पण..."

शाहीद कपूरच्या 'इश्क विश्क' सिनेमात झळकला सिद्धार्थ जाधव, म्हणाला- "मला चांगली भूमिका मिळणार होती, पण..."

सिद्धार्थ जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता. मध्यमवर्गीय घरातून आलेल्या सिद्धार्थने अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात स्थान मिळवलं. काही हिंदी सिनेमांमध्येही तो झळकला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने कलाविश्वातील त्याचा हा प्रवास सांगितला. यावेळी शाहिद कपूरच्या 'इश्क विश्क' सिनेमात झळकल्याचा खुलासाही प्रेक्षकांच्या लाडक्या सिद्धूने केला आहे. 

सिद्धार्थने मॅशेबल इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, "सुपरस्टार हा रिएलिटी शो आला होता ज्याचं होस्टिंग चंकी पांडे सर करत होते. त्या शोमध्ये अभिनय, डान्स, गायन असं सगळंच करायचं होतं. मी माझ्या मित्रासोबत त्या शोमध्ये ऑडिशन द्यायला गेलो होतो. मी त्या शोचा मेगा फायनलचा विनर होतो. तो शो जिंकणारी व्यक्ती अभिनय करणार असेल तर त्याला Tips चा सिनेमा. सिंगर असेल त्याला जतिन भाईसोबत गाण्याची संधी. आणि जो डान्सर असेल त्याला राजू सरांसोबत कोरिओग्राी...अशी बक्षीसे होती. शाहीद कपूरचा जो इश्क विश्क सिनेमा आहे. त्यातील एका गाण्यात मी झळकलो आहे. त्या गाण्यात शाहीद कपूरच्या बाजूला त्याचे काही मित्र दिसतात. त्यामध्ये लाल रंगाची टोपी आणि डंगरीमध्ये एक वेटर दिसतो. तो मी आहे सिद्धार्थ जाधव. केन घोष सरांनी तो सिनेमा दिग्दर्शित केला होता. सिनेमात चांगली भूमिका देतो असं ते म्हणाले होते. पण पुढे ते शक्य झालं नाही".   

सध्या सिद्धार्थ मटका किंग या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. सिद्धार्थने या सीरिजमध्ये विजय वर्मासोबत स्क्रीन शेअर केली असून महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अॅनिमल या नाटकातूनही सिद्धार्थ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या नाटकातून सिद्धार्थने रंगभूमीवर पदार्पण केलं आहे. 

Web Title : सिद्धार्थ जाधव का 'इश्क विश्क' में कैमियो: अवसर चूकने का खुलासा।

Web Summary : सिद्धार्थ जाधव ने 'इश्क विश्क' में वेटर के रूप में अपनी उपस्थिति का खुलासा किया। उन्होंने एक रियलिटी शो जीता, जिससे उन्हें फिल्म का मौका मिला, लेकिन एक बड़ी भूमिका साकार नहीं हो पाई। वर्तमान में, वह 'मटका किंग' और नाटक 'एनिमल' में हैं।

Web Title : Siddharth Jadhav's 'Ishq Vishk' cameo: Missed opportunity revealed.

Web Summary : Siddharth Jadhav revealed his 'Ishq Vishk' appearance, a waiter role. He won a reality show, earning a film chance, but a bigger role didn't materialize. Currently, he's in 'Matka King' and the play 'Animal'.