रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर

By कोमल खांबे | Updated: May 4, 2026 13:18 IST2026-05-04T13:17:05+5:302026-05-04T13:18:11+5:30

बॉक्स ऑफिसवर 'राजा शिवाजी' सिनेमाने वादळ आणलं आहे. अशातच रितेशच्या एका वेड्या चाहत्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी अख्खं थिएटरच बुक केलं. 

ritesh deshmukh fan of ratnagiri booked whole theatre to watch raja shivaji movie | रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर

रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर

Raja Shivaji Movie: रितेश देशमुखचं दिग्दर्शन असलेला 'राजा शिवाजी' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. ठिकठिकाणी या सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. बॉक्स ऑफिसवर 'राजा शिवाजी' सिनेमाने वादळ आणलं आहे. अशातच रितेशच्या एका वेड्या चाहत्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी अख्खं थिएटरच बुक केलं. 

ऋषी भाग्या(Rushi Bhagya) नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. रीलस्टार असलेल्या ऋषी भाग्या(Rushi Bhagya) या कपलने राजा शिवाजी सिनेमा कुटुंबासह पाहिला. लेकीसह राजा शिवाजी सिनेमा पाहण्यासाठी रत्नागिरीच्या ऋषीने अख्खं थिएटरच बुक केलं होतं. सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी थिएटरमध्ये ऋषी त्याची पत्नी आणि त्यांची मुलगी असे तीनच लोक होते. "आमच्या राजाचा सिनेमा बघायला पूर्ण हॉल बूक केलाय", असं कॅप्शन देत थिएटरमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. ॉ


दरम्यान, 'राजा शिवाजी' सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर जिनिलीयाने राणी सईबाईंची भूमिका साकारली आहे. अभिषेक बच्चन, संजय दत्त, बोमन इराणी, विद्या बालन, फरदीन खान या बॉलिवूड कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने तीनच दिवसांत 

Web Title : रितेश देशमुख के दीवाने ने 'राजा शिवाजी' के लिए पूरा थिएटर बुक किया।

Web Summary : रत्नागिरी के रितेश देशमुख के एक प्रशंसक ने अपने परिवार के साथ 'राजा शिवाजी' देखने के लिए एक पूरा थिएटर बुक किया। फिल्म में रितेश शिवाजी महाराज और जेनेलिया रानी साईबाई के रूप में हैं, जिसमें बॉलीवुड सितारे महत्वपूर्ण भूमिकाओं में हैं। फिल्म बॉक्स ऑफिस पर हिट है।

Web Title : Ritesh Deshmukh's crazy fan booked entire theater for 'Raja Shivaji'.

Web Summary : A Ritesh Deshmukh fan from Ratnagiri booked an entire theatre to watch 'Raja Shivaji' with his family. The film stars Ritesh as Shivaji Maharaj and Genelia as Rani Saibai, with Bollywood stars in key roles. The movie is a box office hit.