Video: 'राजा शिवाजी' पाहणाऱ्या चाहत्यांना रितेशने अचानक दिलं सरप्राईज; पुढे घडलं असं काही की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 16:59 IST2026-05-04T16:58:28+5:302026-05-04T16:59:13+5:30

अशातच 'राजा शिवाजी' पाहायला गेलेल्या थिएटरमधील प्रेक्षकांना रितेशने खास सरप्राईज दिलं. रितेश सिनेमा संपल्यावर सर्व चाहत्यांना भेटायला आला. पुढे एक खास गोष्ट घडली. जाणून घ्या.

Riteish deshmukh suddenly gave a surprise to the fans watching 'Raja Shivaji' video viral | Video: 'राजा शिवाजी' पाहणाऱ्या चाहत्यांना रितेशने अचानक दिलं सरप्राईज; पुढे घडलं असं काही की...

Video: 'राजा शिवाजी' पाहणाऱ्या चाहत्यांना रितेशने अचानक दिलं सरप्राईज; पुढे घडलं असं काही की...

'राजा शिवाजी' चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. १ मे २०२६ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. महाराष्ट्रातील बहुतेक सर्व चित्रपटगृहांत 'राजा शिवाजी' सिनेमा प्रेक्षकांच्या हाउसफुल्ल प्रतिसादात सुरु आहे. अशातच 'राजा शिवाजी' पाहायला गेलेल्या थिएटरमधील प्रेक्षकांना रितेशने खास सरप्राईज दिलं. रितेश सिनेमा संपल्यावर सर्व चाहत्यांना भेटायला आला. पुढे एक खास गोष्ट घडली. जाणून घ्या.

'राजा शिवाजी' फेम रितेशला पाहताच चाहत्यांनी काय केलं?

'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षक उपस्थित होते. सिनेमा संपल्यावर रितेश देशमुखला बघून सर्वांनाच चांगलं सरप्राईज मिळालं. रितेशला बघताच सर्व चाहत्यांनी त्याच्याभोवती गराडा घातला. काही चाहत्यांनी रितेशला पाहताच त्याच्या पायांना स्पर्श केला. रितेशने लगेच त्यांना उठवलं आणि त्यांची सदिच्छा स्वीकारली. एकूणच चाहते नतमस्तक झाल्याचं पाहून रितेश चांगलाच भारावून गेला होता. रितेशची उपस्थिती झाल्याने थिएटरमध्ये खऱ्या अर्थाने आनंद पसरला. सर्वांच्या प्रतिक्रिया पाहता 'राजा शिवाजी' त्यांना आवडल्याचं दिसतंय.




'राजा शिवाजी'च्या कमाईबद्दल सांगायचं तर, महाराष्ट्र दिनी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई नोंदवली. त्यानंतर शनिवारी मजबूत पकड कायम ठेवत, रविवारी सिनेमाने आणखी मोठी झेप घेत विकेंडमधील सर्वोच्च कमाई केली. रविवारी सिनेमाने ₹१३.१० कोटी नेट कमाई करत शनिवारीच्या तुलनेत १३.५% वाढ नोंदवली. यासह, तीन दिवसांची एकूण कमाई भव्य ₹३७.०० कोटी नेट झाली आहे. त्यामुळे सिनेमाची एकूण कमाई ३७ कोटींवर पोहोचली आहे.

Web Title : 'राजा शिवाजी' देखने आए दर्शकों को रितेश का सरप्राइज: रोमांचक मुलाकात

Web Summary : रितेश देशमुख ने 'राजा शिवाजी' देखने आए दर्शकों को थिएटर में सरप्राइज दिया। भावुक होकर कुछ प्रशंसकों ने उनके पैर छुए, जिसे उन्होंने विनम्रतापूर्वक स्वीकार किया। महाराष्ट्र दिवस पर रिलीज हुई फिल्म बॉक्स ऑफिस पर सफल रही, तीन दिनों में ₹37 करोड़ कमाए।

Web Title : Ritesh's Surprise Visit to 'Raja Shivaji' Moviegoers: A Thrilling Encounter

Web Summary : Ritesh Deshmukh surprised fans watching 'Raja Shivaji' in theaters. Overwhelmed, some fans touched his feet, which he humbly acknowledged. The movie, released on Maharashtra Day, is a box office success, earning ₹37 crore in three days.