बर्थडे केक, गुलाबाचं फूल अन् मरीन ड्राईव्ह! 'या' अभिनेत्यासोबत रिंकूने साजरा केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 13:44 IST2024-06-04T13:43:48+5:302024-06-04T13:44:25+5:30

परश्या नाही तर 'या' मराठमोळ्या अभिनेत्याने आर्चीला दिलं खास 'बर्थडे सरप्राईज'

Rinku Rajguru celebrated her birthday yesterday with Shiv Thakre actor gave surprise to her on special day | बर्थडे केक, गुलाबाचं फूल अन् मरीन ड्राईव्ह! 'या' अभिनेत्यासोबत रिंकूने साजरा केला वाढदिवस

बर्थडे केक, गुलाबाचं फूल अन् मरीन ड्राईव्ह! 'या' अभिनेत्यासोबत रिंकूने साजरा केला वाढदिवस

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) म्हणजेच सगळ्यांची लाडकी आर्चीचा काल वाढदिवस होता. रिंकूने तिचा हा खास दिवस कसा साजरा केला याची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली आहे. तीन-चार केक, गुलाबाचं फूल, सिद्धीविनायकाचं दर्शन, मरीन ड्राईव्हवर फेरफटका, डिनर अशा पद्धतीने तिने वाढदिवस साजरा केला. पण रिंकूने परश्या नाही पण दुसऱ्याच मराठी अभिनेत्यासोबत सेलीब्रेशन केलं. या अभिनेत्यानेच तिला हे सर्व खास सरप्राईज दिलं. कोण आहे तो अभिनेता?

रिंकू राजगुरुने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिच्या घरी वाढदिवसाचं छान डेकोरेशन केलेलं दिसतंय. नंतर ती बर्थडे केकचा आनंद घेते. मग मरीन ड्राईव्हवर निवांत बसून तिथेही केक कापते. तर व्हिडिओच्या शेवटी ती हातात सुंदर गुलाबाचं फूल घेतलेला फोटो दाखवते. आता रिंकूसाठी हे सर्व कोणी केलं तर ते तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ती लिहिते, "माझा वाढदिवसाचे हे सुंदर क्षण. शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार. हे सुंदर सरप्राईज देऊन हा दिवस खास बनवण्यासाठी  Thank you शिव ठाकरे." रिंकूना या व्हिडिला मागे 'रोजा जानेमन' हे गाणंही लावलं आहे.

तर रिंकूने शिव ठाकरेसोबत हा दिवस साजरा केला. त्यानेच तिला हे खास सरप्राईज दिलं. रिंकूने चाहत्यांचेही शुभेच्छांबद्दल आभार मानले. अतिशय साध्या पद्धतीने तिने वाढदिवस साजरा केला. रिंकू काल २३ वर्षांची झाली. तिने आतापर्यंत 'सैराट' शिवाय 'झुंड', 'कागर', 'मेकअप', 'झिम्मा 2' या सिनेमांमध्येही काम केलं. 'झिम्मा 2' मधली तानिया सगळ्यांनाच भावली.

Web Title: Rinku Rajguru celebrated her birthday yesterday with Shiv Thakre actor gave surprise to her on special day