"हजारो अडचणींवर मात करुन...",'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर रवी जाधवची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 12:51 PM2024-03-27T12:51:45+5:302024-03-27T12:52:08+5:30

Ravi Jadhav : क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नुकताच रिलीज झाला. आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रवी जाधव यानेदेखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Ravi Jadhav's post after watching the movie 'Swatantryaveer Savarkar' | "हजारो अडचणींवर मात करुन...",'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर रवी जाधवची पोस्ट

"हजारो अडचणींवर मात करुन...",'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा पाहिल्यानंतर रवी जाधवची पोस्ट


क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा 'स्वातंत्र्यवीर सावरकर' नुकताच रिलीज झाला. रणदीप हुड्डाने (Randeep Hooda) या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचे आणि त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार मंडळी हा चित्रपट पाहून प्रभावित झाले आहेत आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कौतुकाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रवी जाधव यानेदेखील सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 

रवी जाधवने 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचं पोस्टर शेअर करत कौतुक केले आहे आणि प्रेक्षकांनी चित्रपट आवर्जुन पाहण्याचे आवाहन केले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, प्रत्येकाने आवर्जून पहावा असा चित्रपट!!! रणदीप हुडाला सलाम! उत्तम अभिनय, छायाचित्रण, संकलन, VFX, पार्श्वसंगीत!!! हजारो अडचणींवर मात करुन रणदीपने जिद्दीने ३ वर्ष मेहनत करुन हा प्रेरणादायी चित्रपट पूर्ण केला. आपण केवळ ३ तास वेळ देऊन तो नक्कीच चित्रपटगृहात पाहून प्रेरणा घेऊ शकतो. सावरकरांना वंदन करु शकतो. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारण्याबरोबरच या चित्रपटाचे दिग्दर्शनही रणदीप हुड्डाने केले आहे. या चित्रपटातून त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवले आहे. रणदीप हुड्डाबरोबर या चित्रपटात अभिनेत्री अंकिता लोखंडेही झळकली आहे. अंकिताने या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे. 

Web Title: Ravi Jadhav's post after watching the movie 'Swatantryaveer Savarkar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.