Raja Shivaji: 'राजा शिवाजी'चा बॉक्स ऑफिसवर अटकेपार झेंडा! १४ दिवसांत बक्कळ कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 17:13 IST2026-05-15T17:12:45+5:302026-05-15T17:13:09+5:30
आत्तापर्यंत १४ दिवसांत 'राजा शिवाजी'ने देशात ८४.७० कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच १०० कोटींचा टप्पा हा सिनेमा पार करेल असा अंदाज आहे.

Raja Shivaji: 'राजा शिवाजी'चा बॉक्स ऑफिसवर अटकेपार झेंडा! १४ दिवसांत बक्कळ कमाई
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपट पहिल्या दिवसपासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यातही यशस्वी घोडदौड केली. आता या सिनेमाने तिसऱ्या आठवड्यात पदार्पण केलं आहे. विक्रमी ओपनिंगसह इतिहास रचल्यानंतर 'राजा शिवाजी'ने दुसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई केली.
पहिल्या आठवड्यात 'राजा शिवाजी' सिनेमाने ५७.७० कोटींचा गल्ला जमवला. त्यानंतर दुसऱ्या वीकेंडला १७.४० कोटींची कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात सोमवारी सिनेमाने २.६५ कोटी तर मंगळवारी २.७५ कोटींचा बिजनेस केला. बुधवार आणि गुरुवारी २.१० कोटी कमावण्यात सिनेमाला यश आलं. अशाप्रकारे आत्तापर्यंत १४ दिवसांत 'राजा शिवाजी'ने देशात ८४.७० कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच १०० कोटींचा टप्पा हा सिनेमा पार करेल असा अंदाज आहे.
दरम्यान, 'राजा शिवाजी' सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर जिनिलीया राणी सईबाईंच्या भूमिकेत आहे. संजय दत्त अफजलखान, विद्या बालन बडी बेगम, भाग्यश्री राजमाता जिजाऊ, अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजी भोसले यांच्या भूमिकेत आहेत. तर बोमन इराणी, अमोल गुप्ते, फरदीन खान, जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.