प्रिया बापटनं फिट राहण्यासाठी सांगितल्या 'या' ३ गोष्टी, इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी साधला संवाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 15:41 IST2026-01-23T15:35:27+5:302026-01-23T15:41:55+5:30
प्रिया बापटने उघडलं तिच्या फिटनेसचं गुपित; म्हणाली, "माझं डाएट तुमच्यासाठी नाही..."

प्रिया बापटनं फिट राहण्यासाठी सांगितल्या 'या' ३ गोष्टी, इन्स्टाग्रामवर चाहत्यांशी साधला संवाद
मराठी रंगभूमीपासून हिंदी वेब विश्वापर्यंत आपल्या अभिनयाची जादू पसरवणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रिया बापटनं सोशल मीडियावर शेअर केलेले जिममधले फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. प्रियाचा फिटनेस आणि तिचे 'ट्रान्सफॉरमेशन' पाहून चाहते तिचं कौतुक करताना थकत नव्हते. सर्वांना तिच्या डाएटबद्दल जाणून घ्यायचं होतं. आता खुद्द प्रियानं डाएटबद्दल चाहत्यांना मोलाचा सल्ला दिलाय.
प्रियानं नुकतंच इन्स्टाग्रामवर 'आस्क मी' सेशन घेतलं. यामध्ये प्रियाने तिला एका चाहत्याने "तुझा डाएट प्लॉन शेअर कर" अशी विनंती केली. यावर प्रिया म्हणाली, "माझ्या डाएटबद्दल विचारणाऱ्या सगळ्यांसाठी... डाएट हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो. माझ्यासाठी जे उपयोगी ठरतं, ते तुमच्यासाठी तसंच काम करेलच असं नाही. प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं".
प्रियाने चाहत्यांना फिट राहण्यासाठी खास ३ गोष्टी सांगितल्या. "घरगुती, पारंपरिक आणि पौष्टिक आहारावर ठेवा आणि साखर, मैदा व प्रिझर्व्हेटिव्ह्जपासून दूर रहा. आणि सर्वात महत्त्वाचं वर्कआउट्स अजिबात टाळता येणार नाहीत", असं ती म्हणाली.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत प्रियानं आपल्या साध्या पण प्रभावी जीवनशैलीबद्दल खुलासा केला होता. प्रियाच्या दिनचर्येतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमित व्यायाम, पोषक आहार आणि भरपूर पाणी पिणे. प्रिया म्हणालेली, "मला गोड खूप वाटतं. पण तेही मी प्रमाणातच खाते. फळं भरपूर खाते आणि मला ते खरंच आवडतात. या सगळ्यासाठी मला कोणीही जबरदस्ती करत नाही किंवा हे असंच केलं पाहिजे म्हणून मी हे करत नाही. तर हे मला खरंच आवडतं. खूप वर्षात हेच माझ्या जीवनशैलीचा भाग झालं आहे". विशेष म्हणजे प्रिया रात्री साडेसातच्या आत जेवते.