कोकणच्या लाल मातीत प्रथमेश-क्षितिजाने केलं प्री वेडिंग फोटोशूट; रिअल लाइफ दगडू-प्राजूची होतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:15 PM2024-02-21T12:15:03+5:302024-02-21T12:17:09+5:30

मराठमोळा अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

marathi cinema actor prathmesh parab latest pre-weeding photoshoot in shrivardhan beach photo viral on social media  | कोकणच्या लाल मातीत प्रथमेश-क्षितिजाने केलं प्री वेडिंग फोटोशूट; रिअल लाइफ दगडू-प्राजूची होतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा

कोकणच्या लाल मातीत प्रथमेश-क्षितिजाने केलं प्री वेडिंग फोटोशूट; रिअल लाइफ दगडू-प्राजूची होतीये नेटकऱ्यांमध्ये चर्चा

Prathamesh parab Pre-weeding Photoshoot : 'टाईमपास' फेम अभिनेता प्रशमेश परबचा साखरपुडा नुकताच पार पडला. व्हॅलेंटाईनच्या दिवशीच म्हणजे १४ फेब्रुवारीला प्रथमेशने गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकरसोबत साखरपुडा केला.

'टाइमपास', 'बालक-पालक', 'ताजा खबर', 'दृश्यम' अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणारा अभिनेता प्रथमेश परब लवकरच लग्नबेडीत अडकणार आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून क्षितीजा घोसाळकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता.  येत्या २४ फेब्रुवारीला ही जोडी लग्नंबधनात अडकणार आहे.

नुकतेच प्रतीजाने श्रीवर्धन बीचवर केलेलं प्री-वेडिंग फोटोशूट चर्चेत आलं आहे. पांढऱ्या रंगाचा मॅचिंग गेटअप करत ही जोडी या फोटोंमध्ये कमाल दिसतेय. प्रतीजाचे प्री-वेडिंग फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. 

दरम्यान, प्रशमेश साखरपुडा झाल्यानंतर प्रथमेश त्याच्या सासुरवाडीला कोकणातील श्रीवर्धन येथे पोहचला आहे.काही दिवसांपूर्वी त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सुरुवातीला केळवण त्यानंतर साखरपुडा  आणि आता लवकरच लग्न असा टप्पा पार करत प्रथमेश चाहत्यांना सुखद धक्के देत आहे. 

क्षितीजा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिने साखरपुडा झाल्यानंतर काही निवडक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: marathi cinema actor prathmesh parab latest pre-weeding photoshoot in shrivardhan beach photo viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.