पोरगी झाली रे! प्रसिद्ध मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 10:49 IST2025-11-28T10:47:38+5:302025-11-28T10:49:51+5:30
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा बाबा झाला असून मुलगी झाल्याचा आनंद त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे.

पोरगी झाली रे! प्रसिद्ध मराठी अभिनेता दुसऱ्यांदा झाला बाबा, खास फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
मराठी मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्याच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं आहे. हा अभिनेता आहे अक्षय वाघमारे. अक्षयने सोशल मीडियावर ही गुड न्यूज सर्वांसोबत शेअर केली आहे. अक्षय आणि त्याची पत्नी योगिता गवळी हे दुसऱ्यांदा आई-बाबा झाले आहेत. अक्षयला याआधीही मुलगी झाली होती. आता दुसऱ्यांदा मुलगी झाल्याने अक्षय आणि योगिताच्या आनंदाला उधाण आलं आहे. योगिता ही डॅडी अरुण गवळींची मुलगी आहे.
अक्षय दुसऱ्यांदा झाला बाबा
अक्षयने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. या फोटोत 'सीझन १- मुलगी १, सीझन २- पुन्हा एकदा मुलगी, असं लिहून मुलगी झाली हो'', असं कॅप्शन लिहिलं आहे. ''सीझन २ रिलीज, पोरगी झाली रे...'', अशा खास शब्दात अक्षयने त्याचा आनंद शेअर केला आहे. अक्षयने ही आनंदाची बातमी शेअर करताच मराठी कलाकारांनी आणि अक्षयच्या चाहत्यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
याआधी मे, २०२१ मध्ये अक्षय आणि योगिता पहिल्यांदा आई-बाबा झाले होते. त्यावेळीही खास शब्दांमध्ये अक्षय आणि योगिताने लेकीच्या आगमनाचा आनंद साजरा केला होता. अक्षय व योगिता दोघे लग्नाआधी ५ वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान कुटुंबीयांनी दोघांनाही लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २०२० मध्ये दोघे एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकले. आता दोघांच्याही आयुष्यात दोन मुलींचं आगमन झाल्याने ते आनंदी आहेत.