दे धक्का 2: सिनेमातील 'हा' अभिनेता आहे सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा फेवरेट; अभिनेत्याने पोस्ट केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 01:21 PM2022-08-04T13:21:35+5:302022-08-04T13:21:55+5:30

de dhakka 2: ‘दे धक्का 2’ येत्या ५ ऑगस्टला म्हणजेच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे.

mahesh manjrekar de dhakka 2 marathi movie siddharth jadhav share funny video | दे धक्का 2: सिनेमातील 'हा' अभिनेता आहे सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा फेवरेट; अभिनेत्याने पोस्ट केला व्हिडीओ

दे धक्का 2: सिनेमातील 'हा' अभिनेता आहे सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा फेवरेट; अभिनेत्याने पोस्ट केला व्हिडीओ

googlenewsNext

De Dhakka 2: महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का’ या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. गावात राहणाऱ्या एका साध्या कुटुंबाची कथा या चित्रपटात उत्तमरित्या मांडण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष भावला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा पुढील भाग ‘दे धक्का 2’ येत्या ५ ऑगस्टला म्हणजेच उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता आहे. या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलाकार झळकणार असून अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (siddharth jadhav)  लेकीने तिचा आवडता कलाकार कोणता हे सांगितलं आहे.

मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर, शिवाजी साटम असे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहे. या प्रत्येक कलाकाराचा स्वतंत्र असा चाहतावर्ग असल्यामुळे आपल्या लाडक्या कलाकाराला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. विशेष म्हणजे यामध्येच सिद्धार्थ जाधवच्या लेकीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये  त्याच्या दोन्ही लेकींनी 'दे धक्का 2' मधील कुठला कलाकार त्यांना आवडतो हे सांगितलं आहे.

सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओमध्ये एक फिल्टर असून दे धक्का २ मधील कोणतं कॅरेक्टर तुम्हाला सूट होतं असं या फिल्टरमध्ये दिसून येत आहे. हा फिल्टर सिद्धार्थच्या लेकीने वापरला आहे. विशेष म्हणजे तिच्या चेहऱ्यावर बरोबर वडिलांचा म्हणजेच सिद्धार्थ जाधवचा फोटो आल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तसंच आपला बाबाच आपला फेवरेट असल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसून येत आहे.  त्यांचा हाच व्हिडीओ सिद्धार्थने शेअर केला आहे.

"de dhakka 2 special... कमाल आहे... Instagram story filter... तुमचा favorite कोण?," असं कॅप्शन देत सिद्धार्थने प्रेक्षकांना चित्रपटातील तुमचा आवडता कलाकार कोण? असा प्रश्न विचारला आहे. त्याच्या या प्रश्नावर नेटकऱ्यांनीही कमेंट करत उत्तर दिलं आहे.

दरम्यान, ‘दे धक्का 2’ हा चित्रपट उद्या (5 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘दे धक्का’ चित्रपटातील जवळपास सगळेच कलाकार ‘दे धक्का 2’मध्येही दिसून येणार आहेत. मात्र, यावेळी चित्रपटाची कथा लंडनमध्ये घडताना दिसणार आहे. ‘दे धक्का’ हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला होता. 
 

Web Title: mahesh manjrekar de dhakka 2 marathi movie siddharth jadhav share funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.