नगरसेवक चित्रपटाचा शानदार प्रिमीअर

By Admin | Updated: April 5, 2017 03:09 IST2017-04-05T03:09:31+5:302017-04-05T03:09:31+5:30

चित्रपटगृहांत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नगरसेवक सिनेमाचा शानदार प्रिमीअर नुकताच मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.

The magnificent premiere of the corporator film | नगरसेवक चित्रपटाचा शानदार प्रिमीअर

नगरसेवक चित्रपटाचा शानदार प्रिमीअर


राज्यभरातील १००हून अधिक चित्रपटगृहांत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नगरसेवक सिनेमाचा शानदार प्रिमीअर नुकताच मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांना या वेळी सन्मानित करण्यात आले. नगरसेवक चित्रपटाला शुभेच्छा देत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी या वेळी केले.
समाजकारण हे राजकारणाचे मूळ असायला हवे. मात्र सध्या सत्ताकारण हेच राजकारणाचे मूळ असते असे दिसतेय. समाजातील विघातक प्रवृत्ती आणि राजकारणी यांच्यातील साटेलोटे आपल्या समाजासाठी आणि देशासाठी किती घातक होऊ शकते हे दर्शविण्याचा प्रयत्न नगरसेवकमधून केला गेला आहे.
या चित्रपटात उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रियोग मंत्री, प्रियांका नागरे, अभिजित कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे, मयूरी देशमुख या मातब्बर कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांचा सर्वत्र दमदार प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: The magnificent premiere of the corporator film