न भूतो न भविष्यति! मुंबईची बेक्कार धुलाई, मराठी अभिनेत्री झाली SRH फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 04:35 PM2024-03-28T16:35:40+5:302024-03-28T16:37:31+5:30

MI च्या सलग दुसऱ्या पराभवानंतर अभिनेत्रीची पोस्ट, सनराइज हैदराबाद टीमचं केलं कौतुक

ipl 2024 marathi actress deepti devi shared post after mi lost match against srh | न भूतो न भविष्यति! मुंबईची बेक्कार धुलाई, मराठी अभिनेत्री झाली SRH फॅन

न भूतो न भविष्यति! मुंबईची बेक्कार धुलाई, मराठी अभिनेत्री झाली SRH फॅन

आयपीएलच्या १७व्या हंगामातील आठवा सामना मुंबई इंडियन्स आणि सनराइज हैदराबाद या संघांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात हैदराबादने मुंबईसमोर २७८ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण, हे करताना मुंबई इंडियन्सला पुरता घाम फुटला. हैदराबादने ३१ धावांनी मुंबई विरुद्धचा सामना जिंकला. आणि मुंबई इंडियन्सला आयपीएलमध्ये सलग दुसऱ्यांदा पराभव पत्कारावा लागला. या सामन्यानंतर मराठी अभिनेत्री दिप्ती देवीने पोस्ट शेअर केली आहे. 

सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्समध्ये बुधवारी(२७ मार्च) अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या नाकीनऊ आले. पण, तरीही त्यांनी शेवटपर्यंत खेळ सोडला नाही. तर सनरायजर्स हैदराबादने २७७ धावा करत आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा नवा विक्रम केला आहे. या सामन्यानंतर अभिनेत्री दीप्ती देवीदेखील थक्क झाली आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सनरायजर्स हैदराबाद संघाचं कौतुक केलं आहे. "सूर्य उगवतोय? नाही तळपतोय...हा खरा खेळ आहे...न भूतो न भविष्यति" असं दिप्तीने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

दिप्तीने मुंबई इंडियन्सच्या पहिल्या पराभवानंतरही पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, दिप्तीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. मला सासू हवी, अवघाचि संसार या मालिकांमध्ये ती मुख्य भूमिकेत होती. तर 'नाळ', 'नाळ २', 'घर बंदुक बिरयानी', 'कंडिशन्स अप्लाय', 'पंचक' या सिनेमांमध्येही ती झळकली आहे. 
 

Web Title: ipl 2024 marathi actress deepti devi shared post after mi lost match against srh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.