​नकटीच्या लग्नाला यायचं हा फेम अभिनय सावंतचा झाला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 15:08 IST2017-10-30T09:38:34+5:302017-10-30T15:08:34+5:30

निर्मिती सावंत यांनी गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या ...

This fame came to the marriage of Naqi. Acting Sawant came from Sacharpura | ​नकटीच्या लग्नाला यायचं हा फेम अभिनय सावंतचा झाला साखरपुडा

​नकटीच्या लग्नाला यायचं हा फेम अभिनय सावंतचा झाला साखरपुडा

र्मिती सावंत यांनी गेली अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टी गाजवली आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची अनेक नाटकं गाजली आहेत. त्यांनी केवळ मराठी नव्हे तर हिंदीमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तू तू मैं मैं या मालिकेतील त्यांची व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. निर्मिती सावंत यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा अभिनय देखील याच क्षेत्रात सध्या आपले नशीब आजमावत आहे. अभिनयने श्रीमंत दामोदर पंत या चित्रपटात काम केले होते. सध्या तो नकटीच्या लग्नाला यायचं हा या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तो नुपूर म्हणजेच प्राजक्ता माळीच्या बहिणीच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक होत आहे. मालिकेत नकटीचे लग्न कधी होणार याचा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. या मालिकेतील आपली बहीण नकटीचे लग्न करता करता आता अभिनयने स्वतःचेच लग्न ठरवले आहे. अभिनयचा नुकताच साखरपुडा झाला असून या साखरपुड्याला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. साखरपुडा या शनिवारी म्हणजेच २८ ऑक्टोबरला झाला. 
अभिनयने पूर्वा पंडित या त्याच्या मैत्रिणीशी नुकताच गाजतवाजत साखरपुडा केला. पूर्वा ही देखील अभिनेत्री असून तिने रंगभूमीवर काम केले आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून तिने शिक्षण घेतले आहे. साखरपुड्याला निळ्या रंगाच्या शेरवानीत अभिनय तर पूर्वा हिरव्या रंगाच्या साडीत खूपच छान दिसत होती. पूर्वाने तिच्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवर तिचा आणि अभिनयचा साखरपुड्याचा फोटो टाकून अभिनयच्या फॅन्सना ही गोड बातमी दिली आहे. या फोटोत दोघांची जोडी खूपच छान दिसत आहे. निर्मिती सावंत या अभिनय क्षेत्रात अनेक वर्षं असल्याने या इंडस्ट्रीत त्यांचे अनेक मित्र मैत्रिणी आहेत. त्यांच्या अनेक मित्रमैत्रिणींनी वेळात वेळ काढून या समारंभाला उपस्थिती लावली होती. तेजस्विनी पंडित, रेणुका शहाणे, भार्गवी चिरमुले, आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर यांसारखे मराठीतील अनेक कलाकार या साखरपुड्याला उपस्थित होते. 

Also Read : ​नकटीच्या लग्नाला यायचं हं... या मालिकेच्या टीमचा हा ढिचँक डान्स तुम्ही पाहिला का?

Web Title: This fame came to the marriage of Naqi. Acting Sawant came from Sacharpura