आरारा...रा..! मराठमोळ्या या अभिनेत्रीने केक खाण्याऐवजी लावला चेहरा आणि अंगाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 18:25 IST2020-12-26T18:25:02+5:302020-12-26T18:25:25+5:30

अभिनेत्री चेहरा आणि अंगाला केक लावलेला फोटो शेअर करत चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Arara ... Ra ..! Instead of eating the cake, the actress applied the face and limbs | आरारा...रा..! मराठमोळ्या या अभिनेत्रीने केक खाण्याऐवजी लावला चेहरा आणि अंगाला

आरारा...रा..! मराठमोळ्या या अभिनेत्रीने केक खाण्याऐवजी लावला चेहरा आणि अंगाला

'दिल दोस्ती दुनियादारी' ही झी वाहिनीवरील मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सुजय, कैवल्य, आशु, अॅना, मीनल, रेश्मा, राकेश, सॅम, किंजल, निशा, रेवा, कबीर या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. आज ही मालिका संपून काही वर्षं लोटली असली तरी ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात आहे. या मालिकेतील 'निशा' तुम्हाला आठवतेय का? या मालिकेत ती राकेशच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली होती. तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री मंजिरी पुपालाने साकारली होती. मंजिरीला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

मंजिरी पुपाला सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच तिने एक फोटो शेअर केला आहे. जो पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. मंजिरी पुपालाने इंस्टाग्रामवर जो फोटो शेअर केला आहे. त्यात तिच्या हातात केक पहायला मिळतो आहे. इतकेच नाही तर तिच्या चेहऱ्याला आणि अंगालाही केक लागल्याचे पहायला मिळते आहे. तिने हा फोटो शेअर करत चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरीच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 


मंजिरीने दिल दोस्ती दुनियादारी मालिकेनंतर ग्रहण या मालिकेत ती झळकली. याशिवाय ती मराठी चित्रपट पार्टीमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

तसेच हिंदी टेलिव्हिजनवरील ‘इश्कबाझ - प्यार की एक धिंचाक कहानी’ या मालिकेत तिने एसीपी आदिती देशमुखची भूमिका साकारताना दिसली होती.

तसेच मंजिरी नेटफ्लिक्सवरील बेताल या वेबसीरिजमध्ये एका आदिवासी महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Web Title: Arara ... Ra ..! Instead of eating the cake, the actress applied the face and limbs