'ये गो ये..ये मैना..' गाण्यावर अंकुश अन् सुकन्या मोनेंचा जबरदस्त डान्स; दिपादेखील झाली थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 03:55 PM2023-07-20T15:55:53+5:302023-07-20T15:56:35+5:30

सध्या अंकुश आणि सुकन्या मोने यांचा भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Ankush and Sukanya Mone's amazing dance on the song 'Ye Go Ye..Ye Maina..'; Deepa was also shocked | 'ये गो ये..ये मैना..' गाण्यावर अंकुश अन् सुकन्या मोनेंचा जबरदस्त डान्स; दिपादेखील झाली थक्क

'ये गो ये..ये मैना..' गाण्यावर अंकुश अन् सुकन्या मोनेंचा जबरदस्त डान्स; दिपादेखील झाली थक्क

googlenewsNext

जेव्हा चार बायका एकत्र येतात तेव्हा त्या काहीही करु शकतात, हे जे म्हटलं जातं ते काही खोटं नाही. आता बाईपण भारी देवा सिनेमाचंच घ्या ना. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.  या सिनेमाने अवघ्या काही दिवसांमध्ये कोट्यवधींची कमाई केल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे नुकतीच या सिनेमाची सक्सेस पार्टी दणक्यात पार पडली. विशेष म्हणजे या पार्टीमध्ये सुकन्या मोने यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. प्रत्येक गाण्यावर ताल धरत त्यांनी पार्टीची रंगत वाढवली. यामध्येच त्यांचा आणि अंकुशचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 या सिनेमात कोणतीही ग्लॅमरस अभिनेत्री नसतानाही तो सुपरहिट झाला. विशेष म्हणजे त्यामागे एक खास कारण आहे. ते कारण, म्हणजे अभिनयात छान मुरलेल्या दिग्गज, अनुभवी अभिनेत्री. या सिनेमात मराठीतील ६ दिग्गज अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकल्या असून या सहाही अभिनेत्रींनी ही सिनेमा हिट करुन दाखवला. त्यामुळेच आज या सिनेमाने कोटींची भरारी घेतली आहे. या निमित्ताने एका सक्सेस पार्टीचं आयोजन  करण्यात आलं होतं. यावेळी मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यात दिपा परब-चौधरीचा नवरा अर्थात अभिनेता अंकुश चौधरीदेखील आला होता. विशेष म्हणजे यावेळी अंकुश आणि सुकन्या कुलकर्णी यांनी भन्नाट डान्स केला.

सध्या सोशल मीडियावर सुकन्या कुलकर्णी-मोने आणि अंकुशचा एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या दोघांनी 'ये गो ये..ये मैना' या उडत्या चालीच्या गाण्यावर डान्स केला. त्यांचा हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांना चांगलाच आवडला असून तो व्हायरल होत आहे.
 

Web Title: Ankush and Sukanya Mone's amazing dance on the song 'Ye Go Ye..Ye Maina..'; Deepa was also shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.