केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 17:04 IST2025-06-24T17:04:26+5:302025-06-24T17:04:57+5:30

केदारनाथवरुन परत येताच अमृता आजारी पडली आहे. पण, नुकतंच तिने चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर Ask me सेशन घेत त्यांना उत्तरं दिली आहेत. 

amruta khanvilkar reply to fan who asked her about kedarnath yatra | केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."

केदारनाथला देवाकडे काय मागितलं? चाहत्याचा प्रश्न, अमृताचं मन जिंकणारं उत्तर, म्हणाली- "खरं सांगू..."

मराठी सिनेसृष्टीची चंद्रमुखी अमृता खानविलकर नुकतीच उत्तराखंडमधील केदारनाथला जाऊन आली. अमृताने केदारनाथचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले होते. केदारनाथला जात अमृताने शिवलिंगाचं दर्शन घेत उत्तराखंडच्या हिमालयातील नयनरम्य दृश्य चाहत्यांना दाखवलं होतं. केदारनाथवरुन परत येताच अमृता आजारी पडली आहे. पण, नुकतंच तिने चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर Ask me सेशन घेत त्यांना उत्तरं दिली आहेत. 

अमृताला चाहत्यांनी तिची केदारनाथ यात्रा आणि नवीन प्रोजेक्टबाबतही प्रश्न विचारले. "तुम्ही केदारनाथला देवाकडे काय मागितलं?" असा प्रश्न एका चाहत्याने अमृताला विचारला. त्यावर अभिनेत्रीने मन जिंकणारं उत्तर दिलं. "खरं सांगू, मी थँक्यू बोलले आणि सगळं छान नीट ठेव इतकंच", असा रिप्लाय अभिनेत्रीने दिला. "केदारनाथच्या यात्रेतून काय शिकलात? काही वेगळा अनुभव आला का", असा प्रश्नही अमृताला विचारला. ती म्हणाली, "मला वाटतं डेस्टिनेशनपेक्षा जर्नी खूप महत्त्वाची असते. प्रत्येक श्वास तुम्हाला मंदिराच्या एक पाऊल जवळ घेऊन जातो आणि अवघड ट्रेक तुम्हाला नम्रता शिकवतो". 

अमृता ही प्राजक्ता माळीसोबत केदारनाथ ट्रिपला गेली होती. केदारनाथ सोबत तिने चार धामपैकी एक असलेल्या बद्रिनाथ मंदिरालाही भेट दिली. अमृता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. नवीन प्रोजेक्टसोबतच ती वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असते. 

Web Title: amruta khanvilkar reply to fan who asked her about kedarnath yatra