सई ताम्हणकरला पाहिजे असाच जोडीदार, खुलासा करत म्हणाली - '60 वर्ष जरी त्या व्यक्तीबरोबर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 04:12 PM2024-01-17T16:12:03+5:302024-01-17T16:13:24+5:30

सई ताम्हणकरने नुकतंच जोडीदाराबद्दल भाष्य केले.

Actress Sai Tamhankar Talk About The Expectations From A Partner Real Life See Video | सई ताम्हणकरला पाहिजे असाच जोडीदार, खुलासा करत म्हणाली - '60 वर्ष जरी त्या व्यक्तीबरोबर...'

सई ताम्हणकरला पाहिजे असाच जोडीदार, खुलासा करत म्हणाली - '60 वर्ष जरी त्या व्यक्तीबरोबर...'

मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत सई ताम्हणकरचं नाव कायमच घेतलं जातं. फक्त मराठी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही सईने तिची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिचे फॅन फॉलोईंगही फार मोठे आहे. तिच्या रिलेशनशिपचीही अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळते. त्यामुळेही ती सतत चर्चेत असते. सई ताम्हणकरने नुकतंच 'लोकमत फिल्मीशी' बोलताना जोडीदाराबद्दल भाष्य केले. यामध्ये तिनं आपल्या जोडीदारबद्दलची अपेक्षा सांगितली आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगलेली आहे.

'लोकमत फिल्मीशी' बोलताना तिनं हटके आणि मस्त गप्पा मारल्या. सोबतच विचारलेल्या प्रश्नांनी सईनं फार प्रामाणिकपणे उत्तर दिली होती. त्यामुळे अनेकांनी तिचं कौतुकही केले आहे. तेव्हा पाहुया नक्की तिनं या व्हिडीओतून आपल्या जोडीदाराबद्दलच्या कोणत्या अपेक्षा सांगितल्या आहेत. ती म्हणाली, 'मला असं वाटतं की शोधून सुध्दा उरतं ना अशी व्यक्ती पाहिजे. म्हणजे 60 वर्ष जरी त्या व्यक्तीबरोबर राहिलं. तरी त्याचे नवीन गुण समोर आले पाहिजेत. असा जोडिदार पाहिजे, ज्यांच्याशी तुम्ही काहीही बोलू शकता'. 

पुढे ती म्हणाली, 'मी हे निरक्षण केलं आहे की, लग्न झालेले मुले-मुली हे आपल्या जोडिदारासमोर वेगळे असतात आणि मित्र मैत्रीणींसमोर वेगळे वागतात. हे मला नाही आवडत. शिजतं ते दिसतं हे सगळीकडे असावं. नात्यात स्पेस दिला पाहिजे.  त्यामुळे एक ओढ जिवंत राहते. ती व्यक्ती आयुष्यात येण्याआधी आपलं एक जग असतं. त्यामुळे ती व्यक्ती आल्यानंतरही ते जग कायम राहिलं पाहिजे. या सगळ्यांचं एकत्रिकरण म्हणजे जोडिदार'.

 सईच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास,  लवकरच ‘श्रीदेवी प्रसन्न’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सई अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर पाहायला मिळणार आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. २ फेब्रुवारीला सई व सिद्धार्थचा ‘श्रीदेव प्रसन्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
 

Web Title: Actress Sai Tamhankar Talk About The Expectations From A Partner Real Life See Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.