एकेकाळी ट्रेनच्या दारात बसून केला प्रवास, आज 'तो' स्टार गायक! संघर्ष वाचून डोळे पाणावतील, म्हणाला-"तो प्रवास आठवला की..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 10:38 IST2026-05-10T10:32:21+5:302026-05-10T10:38:49+5:30
"तो प्रवास फार काही सोपा नव्हता...", लोकप्रिय गायकाचं संघर्ष काळावर भाष्य, म्हणाला-" पाऊस असो वा कडक ऊन..."

एकेकाळी ट्रेनच्या दारात बसून केला प्रवास, आज 'तो' स्टार गायक! संघर्ष वाचून डोळे पाणावतील, म्हणाला-"तो प्रवास आठवला की..."
Sanju Rathod: जळगाव जिल्ह्यातील धानवड तांडा या छोट्याशा खेड्यातून आलेल्या संजू राठोड या कलाकाराने मनोरंजनविश्वात स्वत: ची एक वेगळी छाप उमटवली. संजूची एक खास ओळख म्हणजे त्याच्या गाण्यांमधून ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि सौंदर्य प्रभावीपणे मांडलेलं असतं. अलिकडच्या काळात त्याचं प्रत्येक गाणं हे सोशल मीडियावर हिट ठरतंय. इतकंच नाहीतर सर्वसामान्यांसह अगदी सेलिब्रिटी मंडळींना देखील संजू राठोडच्या गाण्यांची भूरळ पडत असल्याचं पाहायलं मिळतंय. 'नऊवारी साडी', 'गुलाबी साडी', 'एक नंबर तुझी कंबर' या गाण्यांमुळे तो खऱ्या अर्थानं नावारुपाला आला. सध्या त्याचं 'लाल लाल कलरची बांगडी' हे गाणे चांगलंच ट्रेडमध्ये आहे. याचदरम्यान, संजूने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टद्वारे त्याने त्याच्या संघर्षकाळावर भाष्य केलं आहे.
आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत गायकाने त्याच्या संघर्षकाळातील आठवणी सांगितल्या आहेत. संजू राठोडने या पोस्टमध्ये लिहिलंय," ट्रेनच्या प्रवासानेच मला यशाच्या स्टेशनपर्यंत पोहोचवले...तो प्रवास आठवला की डोळे भरून येतात, पण चेहऱ्यावर एक समाधान असतो...जेव्हा पाय दुखायचे तेव्हा मन सांगायचं, 'आज चालून घे, उद्या तुला धावायचं आहे.' त्या संघर्षानेच आज मला ही गती दिली आहे."
पुढे त्याने म्हटलंय," पाऊस असो वा कडक ऊन, ध्येयापर्यंत पोहोचण्याची ओढ इतकी होती की कधी थकवा जाणवलाच नाही.माझा भूतकाळ आजही माझ्या आठवणीत जिवंत आहे, कारण त्याच प्रवासाने मला सांगितलं की शून्याची किंमत काय असते...कधीकधी मला प्रवासातील ते जुने दिवस आठवतात. ती तो प्रवास फार काही सोप नव्हता, तर त्या वेळी मला जाणवणारी भूक अत्यंत निखळ होती म्हणून. ताट भरलेले असतानाही, ती भूक तशीच कायम राखणं महत्त्वाचं असतं.माझ्या या प्रवासात सुरुवातीपासून साथ देणाऱ्या आणि माझ्या संगीतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे." अशा आशयाची पोस्ट त्याने शेअर केली आहे.