सातच्या आत घरात यायचं! मराठी अभिनेत्रीला होती सक्त ताकीद, म्हणाली- "माझ्या आईवडिलांनी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 16:19 IST2025-05-30T16:18:46+5:302025-05-30T16:19:41+5:30

संध्याकाळी सात वाजायच्या आत घरात यायचा असा नियाम तिच्या आईवडिलांनी घालून दिला होता. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबाबत सांगितलं.

kishori godbole mom dad strictly told her to come home before 7pm actress revealed the rule | सातच्या आत घरात यायचं! मराठी अभिनेत्रीला होती सक्त ताकीद, म्हणाली- "माझ्या आईवडिलांनी..."

सातच्या आत घरात यायचं! मराठी अभिनेत्रीला होती सक्त ताकीद, म्हणाली- "माझ्या आईवडिलांनी..."

'माझा नवरा तुझी बायको', 'खबरदार', 'फुल ३ धमाल', 'जत्रा' अशा सिनेमांमध्ये अभिनेत्री किशोरी गोडबोलेने काम केलं आहे. काही गाजलेल्या मालिकांमध्येही ती दिसली. मराठीसोबत किशोरीने अनेक हिंदी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. किशोरीने तिची लेक सई गोडबोलेसह लोकमत फिल्मीच्या सेलिब्रिटी किड्स या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीत मायलेकींनी त्याच्या पर्सनल आयुष्याबाबतही भाष्य केलं. 

या मुलाखतीत किशोरी गोडबोलेने तिच्या आईवडिलांबद्दल भाष्य केलं. संध्याकाळी सात वाजायच्या आत घरात यायचा असा नियम तिच्या आईवडिलांनी घालून दिला होता. ती म्हणाली, "सातच्या आत घरात हा माझ्यासाठी रूल होता. पण, माझा स्वभाव असा आहे की मी माझ्या आईवडिलांना कधीही दोष दिला नाही. सातच्या आत घरात काय...नंतर आम्हाला मजा नाही का करायची? मी काय करायचे की ठीके आईबाबांनी सांगितलं संध्याकाळी सातच्या आत घरात की मी सातपर्यंत मैत्रिणींसोबत खूप मज्जा करायचे". 


"त्यावेळी कॉलेज असायचं. मग कधीकधी पिक्चर बघायला जायचो. कुठेही गेलो, काही बाहेर खायला गेलो, फिरायला गेलो सगळी मज्जा करून मी बरोबर सातच्या आत घरात असायचे...शुभंकरोती म्हणायला. कारण, आपल्या आई वडिलांबद्दलचा हा आदर आहे की त्यांनी सांगितलंय ना...मी नियमात राहून पण खूप मजेत असायचे. मला कधीच त्या नियमांचा जाच नाही वाटला. कारण माझ्या आईवडिलांसाठी ते प्रेम आणि आदर होता", असंही ती म्हणाली.

Web Title: kishori godbole mom dad strictly told her to come home before 7pm actress revealed the rule