'जय जिजाऊ - जय शिवराय', नागराज मंजुळेंची थेट अमेरिकेतून शिवजयंती साजरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 07:19 IST2019-02-19T07:17:21+5:302019-02-19T07:19:30+5:30

मुंबई - सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी फेसबुकवरुन एक फोटो अपलोड केला आहे. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या मुहूर्तावर चक्क शिवाजी ...

Jai Jijau - Jai Shivrai, Nagraj Manjulanee celebrated Shivajayati directly from the United States | 'जय जिजाऊ - जय शिवराय', नागराज मंजुळेंची थेट अमेरिकेतून शिवजयंती साजरी

'जय जिजाऊ - जय शिवराय', नागराज मंजुळेंची थेट अमेरिकेतून शिवजयंती साजरी

मुंबई - सैराट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी फेसबुकवरुन एक फोटो अपलोड केला आहे. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या मुहूर्तावर चक्क शिवाजी महाराजांच्या वेशातील तरुणासोबत नागराज यांनी हा फोटो शेअर केला आहे. तसेच, असा योग कधी तरीच येतो, असे कॅप्शनही नागराजने लिहिले असून थेट अमेरिकेतून हा फोटो अपलोड करण्यात आला आहे. 

राज्यासह जगभरातील मराठीजणांकडून आज शिवजयंती साजरी करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट अमेरिकेत शिवजन्मोत्सव साजरा केला. याबाबतचा फोटोही नागराज यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन टाकला आहे. असा सेल्फी काढण्याचा मोह कधी तरीच होतो, असे कॅप्शन नागराज यांनी या फोटोला दिले असून फोटोत शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला तरुण आणि पाठीमागे मावळ्यांच्या वेशात आणखी दोन तरुण दिसत आहेत. 

कन्सॉलेट जनरल ऑफ इंडिया, छत्रपती फाऊंडेशन आणि अल्बनी ढोल पथक यांच्यावतीने अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे शिवजयंती महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या शिवजयंती महोत्सवाला नागराज मंजुळेंना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा करुन शिवरायांचा इतिहास जागविण्याचा प्रयत्न अमेरिकेतील मराठी मंडळींकडून करण्यात येत आहे.    

Web Title: Jai Jijau - Jai Shivrai, Nagraj Manjulanee celebrated Shivajayati directly from the United States