Video: पापाराझीला बोलवलं, खांद्यावर हात टाकला आणि फोटो काढला; रिहानाच्या कृतीने जिंकली मनं, होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 10:03 IST2026-04-25T10:00:02+5:302026-04-25T10:03:39+5:30

फोटो काढणाऱ्या एका पापाराझीला रिहानाने बोलवलं. त्याच्या खांद्यावर तिने हात टाकला आणि त्याच्यासोबत फोटोसाठी पोझही दिली. इव्हेंटमधील रिहानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

rihanna pose with paparazi in mumbai event fans praised her video viral | Video: पापाराझीला बोलवलं, खांद्यावर हात टाकला आणि फोटो काढला; रिहानाच्या कृतीने जिंकली मनं, होतंय कौतुक

Video: पापाराझीला बोलवलं, खांद्यावर हात टाकला आणि फोटो काढला; रिहानाच्या कृतीने जिंकली मनं, होतंय कौतुक

वर्ल्ड फेमस पॉप सिंगर रिहाना काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा भारतात आली. रिहानाचे एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाले होते. यापूर्वी रिहाना अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नासाठी भारतात आली होती. त्यामुळे ती आता परत भारतात का आली आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. रिहाना फेंटी ब्युटी या इव्हेंटसाठी भारतात आली आहे. या इव्हेंटला तिने हजेरी लावली होती. या इव्हेंटमधील पापाराझीसोबतचा रिहानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

शुक्रवारी मुंबईत पार पडलेल्या इव्हेंटमध्ये रिहाना रेड कार्पेटवर अवतरली. तिने या इव्हेंटसाठी खास काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तिने पापाराझींना फोटोसाठी पोझही दिल्या. मात्र या इव्हेंटमध्ये तिच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकली. फोटो काढणाऱ्या एका पापाराझीला रिहानाने बोलवलं. त्याच्या खांद्यावर तिने हात टाकला आणि त्याच्यासोबत फोटोसाठी पोझही दिली. इव्हेंटमधील रिहानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

इव्हेंटमधील रिहानाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. "तू राणीसारखी आहेस", "तुला हॅट्स ऑफ" अशा कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत. "बॉलिवूड सेलिब्रिटीही पापाराझींसोबत असे फोटो काढत नाहीत", अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने "हे खूप आवडलं. दुसऱ्यांबद्दल त्याच्या कामाने कोणीही मत बनवू नये", असं म्हटलं आहे. "ती किती प्रेमळ आहे, तो मुलगा लाजला", अशी कमेंटही केली आहे. फेंटी ब्युटीच्या या इव्हेंटला ईशा अंबानी, जान्हवी कपूर, ऑरी, कनिका कपूर, शनाया कपूर, क्रिती सेनॉन यांनीही हजेरी लावली होती. 

Web Title : रिहाना ने पपराज़ी के साथ तस्वीर खिंचवाई, जीता दिल।

Web Summary : रिहाना फेंटी ब्यूटी इवेंट के लिए भारत आईं और पपराज़ी के साथ पोज़ देकर सबका दिल जीत लिया। उनकी इस सादगी की ऑनलाइन प्रशंसा हो रही है। कई बॉलीवुड सितारे ऐसा नहीं करते।

Web Title : Rihanna's gesture wins hearts, poses with paparazzi in Mumbai.

Web Summary : Rihanna, visiting India for her Fenty Beauty event, charmed everyone by posing with a paparazzi member. Her simple gesture of putting her arm around him and taking a photo is being praised online. Many Bollywood stars don't do this.