​लिओनार्दो डिकॅप्रिओ करणार गोल्डन ग्लोब पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 18:38 IST2017-01-06T18:32:01+5:302017-01-06T18:38:14+5:30

तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्काराचा मानकरी लिओनार्दो डिकॅप्रिओ यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात स्वत: एक पुरस्कार प्रदान करणार आहे. आयोजकांनी सोशल ...

Leonardo DiCaprio Awarded Golden Globe Award | ​लिओनार्दो डिकॅप्रिओ करणार गोल्डन ग्लोब पुरस्कार प्रदान

​लिओनार्दो डिकॅप्रिओ करणार गोल्डन ग्लोब पुरस्कार प्रदान

न वेळा गोल्डन ग्लोब पुरस्काराचा मानकरी लिओनार्दो डिकॅप्रिओ यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात स्वत: एक पुरस्कार प्रदान करणार आहे. आयोजकांनी सोशल मीडियावर याची अधिकृत घोषणा केली की, ८ जानेवारी रोजी होणाऱ्या ७४ व्या गोल्ड ग्लोब पुरस्कार सोहळ्यात लिओ प्रेझेंटर म्हणून सहभागी होणार आहे. यावेळी त्याच्यासोबत क्रिस्टन विग ही अभिनेत्री राहणार.

‘हॉलीवूड फॉरेन प्रेस असोसिएशन’तर्फे १९४३ पासून दरवर्षी या पुरस्कारांचे वाटप केले जाते. चित्रपट आणि टीव्हीवरील सर्वोत्तम कलाकृती, कलाकार व तंत्रज्ञांचा सन्मान या पुरस्कार सोहळ्यात केला जातो. लिओने आतापर्यंत - द एव्हिएटर, द वुल्फ आॅफ वॉल स्ट्रीट आणि द रेव्हनंट - असे तीन वेळा सर्वोत्तम अभिनेत्याचा गोल्डन ग्लोब पुरस्कार जिंकलेला आहे.

विशेष म्हणजे १९९४ साली ‘व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप’मधील भूमिकेसाठी प्रथम नामांकन मिळालेला लिओ अद्याप ११ वेळा गोल्डन ग्लोबसाठी नामांकित झालेला आहे. यंदाचा गोल्ड ग्लोब्स कॉमेडियन जिमी फॅलन होस्ट करणार आहे. यापूर्वी त्याने प्राईम टाईम एमी अवॉर्ड्स (२०१०), एमटीव्ही मुव्ही अवॉर्ड्स (२००१) आणि एमटीव्ही व्हिडिओ म्युझिक अवॉर्ड्स होस्ट केलेले आहेत.

                           Golden Globes Twitter

यावेळच्या पुरस्कार सोहळ्यात जेष्ठ अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांना सेसिल बी. डिमेल लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. आयोजकांनी यापूर्वी व्हॉओला डेव्हिस, सिल्वेस्टर स्टॅलोन, जॉन हॅम, क्रिस हेम्सवर्थ, ब्री लार्सन, सोफिआ वर्गारा, झोई सॅल्डाना, गॅल गडोट, कार्ल वेदर्स, मॅट डेमन, एमी शुमर, रिझ विदरस्पून इ. कलाकारांची नावे प्रेझेंटर म्हणून घोषित केलेली आहेत.

cnxoldfiles/a> गोल्डन ग्लोबच्या ट्विटर पेजवर घोषणा करण्यात आली की, आम्हाला ७४ व्या गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सचे प्रेझेंटर्स म्हणून टिमोथी ओलिफँट, जस्टिन थेरॉक्स आणि प्रियांका चोप्रा यांच्या नावाची घोषणा करताना विशेष आनंद होतो आहे.

Web Title: Leonardo DiCaprio Awarded Golden Globe Award