हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने केले भगवतगीतेचे अध्ययन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2017 15:47 IST2017-12-22T10:14:39+5:302017-12-22T15:47:03+5:30

जवळपास संपूर्ण ‘भगवतगीता’ या धार्मिक ग्रंथाचे वाचन करणाºया हॉलिवूड अभिनेता विल स्मिथच्या मते, ‘भारत दौºयात या संपूर्ण पवित्र ग्रंथाचे ...

Hollywood actor Will Smith made a study of Gods! | हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने केले भगवतगीतेचे अध्ययन !

हॉलिवूड अभिनेता विल स्मिथने केले भगवतगीतेचे अध्ययन !

ळपास संपूर्ण ‘भगवतगीता’ या धार्मिक ग्रंथाचे वाचन करणाºया हॉलिवूड अभिनेता विल स्मिथच्या मते, ‘भारत दौºयात या संपूर्ण पवित्र ग्रंथाचे वाचन करणे म्हणजे स्वत:मधील अर्जुनाला नवे रूप देण्यासारखे होते.’ चौथ्यांदा भारत दौºयावर आलेल्या स्मिथने म्हटले की, ‘मी या अगोदरही भारतात आलो आहे. मला येथील इतिहास आवडतो. मी ‘भगवतगीता’ या ग्रंथाचे जवळपास ९० टक्के अध्ययन केले आहे. हा ग्रंथ वाचल्यानंतर मला स्वत:मधील अर्जुनाला एक नवे रूप देता आले. मी पुढच्या वेळेस ऋषिकेशला जाणार आहे. मी त्याठिकाणी बराच काळ व्यतित करण्याची योजना आखत आहे.  

अभिनेता जोएल एजर्टन, नूमी रेपेस आणि दिग्दर्शक डेविड एयर यांच्यासोबत एक दिवसासाठी मुंबईला आलेल्या स्मिथने त्याच्या आगामी ‘ब्राइट’ या चित्रपटाच्या प्रीमियरअगोदर चाहत्यांच्या गर्दीसमोर जाताना सांगितले की, ‘मी विल स्मिथ आहे. याठिकाणी येऊन आम्ही खूप उत्साहित आहोत.’ या अगोदर मीडियाशी बोलताना स्मिथने म्हटले की, ‘मी अखेरीस जेव्हा याठिकाणी आलो होतो, तेव्हा आम्ही अक्षयकुमारच्या घरी पार्टी केली होती. मला तेथील जेवण खूप आवडले होते. मी माझ्या आयुष्यात कधीच एवढे स्वादिष्ट भोजन केले नव्हते.’ स्मिथचा ‘ब्राइट’ २२ डिसेंबर रोजी नेटिफ्लक्सवर रिलीज होणार आहे. 



स्मिथने म्हटले की, मला या सायंस फिक्शनमध्ये काम करताना खूप चांगला अनुभव आला. कारण मला या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जातीयतेची दुसरी बाजू जवळून बघण्याची संधी मिळाली. हा चित्रपट जातीयतेवर आधारित असून, आपण एकमेकांसोबत कशा पद्धतीने वागतो या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

Web Title: Hollywood actor Will Smith made a study of Gods!