विजय माल्यावर येतोय सिनेमा, हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 12:54 IST2018-05-29T12:52:17+5:302018-05-29T12:54:18+5:30

बॅंकांचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून देश सोडून फरार झालेला उद्योगपती विजय माल्यावर आता सिनेमा येणार आहे. रंगीला राजा' असं या सिनेमाचं टायटल असून

Govinda to play Mallya in upcoming movie Rangeela Raja | विजय माल्यावर येतोय सिनेमा, हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका!

विजय माल्यावर येतोय सिनेमा, हा अभिनेता साकारणार मुख्य भूमिका!

मुंबई : बॅंकांचं हजारो कोटींचं कर्ज बुडवून देश सोडून फरार झालेला उद्योगपती विजय माल्लावर आता सिनेमा येणार आहे. रंगीला राजा' असं या सिनेमाचं टायटल असून या सिनेमात अभिनेता गोविंदा मुख्य भूमिका साकारणार आहे. गोविंदा पहिल्यांदाज अशाप्रकारची भूमिका साकाणार असल्याने सर्वांनाच या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.  

या सिनेमाचं दिग्दर्शन वादग्रस्त दिग्दर्शक पहलाज निहलानी हे करणार आहे. ते म्हणाले की, रंगीला राजामध्ये गोविंदाला अशी भूमिका देण्यात आली आहे जी भारतात घोटाळा करुन परदेशात पळालेल्या विजय माल्ल्याच्या घोटाळ्याशी प्रेरित आहे. या सिनेमावर सध्या जोरदार काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच गोविंदाने या सिनेमासाठी गाणं गायलं. हा सिनेमा ऑगस्टमध्ये रिलीज होणार आहे.

गोविंदा आणि पहलाज निहलानी हे गेल्या 35 वर्षांपासून एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे गोविंदाने हा सिनेमा स्विकारल्याचे बोलले जात आहेत. पण गोविंदाची ही भूमिका प्रेक्षकांना किती पसंत पडेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. 
 

Web Title: Govinda to play Mallya in upcoming movie Rangeela Raja