विनित शर्मा भयमध्ये साकारणार गँगस्टरची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2017 02:47 IST2017-03-11T02:47:48+5:302017-03-11T02:47:48+5:30

विनीत शर्मा ‘भय’ या मराठी चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. कलाकाराने नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे असे विनीतला वाटते.

Gangtor plays role in Vinit Sharma's fear | विनित शर्मा भयमध्ये साकारणार गँगस्टरची भूमिका

विनित शर्मा भयमध्ये साकारणार गँगस्टरची भूमिका

विनीत शर्मा ‘भय’ या मराठी चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. कलाकाराने नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणे गरजेचे आहे असे विनीतला वाटते. विनीतने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली आहे. त्यामुळे आता तो एक वेगळी भूमिका साकारणार आहे. तो प्रेक्षकांना आता गँगस्टरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
5 जी इंटरनॅशनल प्रस्तुत आणि सचिन कटारनवरे निर्मित भय या चित्रपटात प्रेक्षकांना विनीत गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील विनीतचा लूकदेखील खूप वेगळा असणार आहे. हा चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन राहुल भातणकर यांचे आहे. ही भूमिका साकारण्यासाठी विनीत खूपच उत्सुक आहे. तो सांगतो, ‘आजवरच्या माझ्या कारकिर्दीत मला पोलिस इन्स्पेक्टरचाच रोल साकारायला मिळाला आहे. भय या चित्रपटात मी पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मी या चित्रपटात एका गँगस्टरची भूमिका साकारत आहे. माझा जन्म मुंबईतील चेंबूर येथील असल्याने मी गँगस्टरच्या लकबी अगदी जवळून पाहिल्या आहेत. याचा वापर मी ‘भय’मधील माझी भूमिका अधिकाधिक चांगली व्हावी यासाठी केला आहे. ‘भय’ या चित्रपटाच्या निमित्ताने मला एक वेगळी भूमिका साकारायला मिळाली याचा मला आनंद होत आहे.’ भय या चित्रपटात अभिजित खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, सिद्धार्थ बोकडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद नितीन विजय सुपेकर यांचे आहेत.

Web Title: Gangtor plays role in Vinit Sharma's fear