अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
By कोमल खांबे | Updated: May 18, 2026 09:09 IST2026-05-18T09:08:58+5:302026-05-18T09:09:52+5:30
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी कलाविश्वितील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी हजेरी लावली. रेड कार्पेटवर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मराठी संस्कृती जपत पारंपरिक लूक केल्याचं दिसलं.

अभिमानास्पद! कान्सच्या रेड कार्पेटवर अशोक-निवेदिता सराफ यांनी जपली मराठी संस्कृती, अशोकमामांच्या 'त्या' कृतीने जिंकली मनं
Cannes 2026: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी कलाविश्वितील दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी हजेरी लावली. रेड कार्पेटवर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांनी मराठी संस्कृती जपत पारंपरिक लूक केल्याचं दिसलं. अशोक-निवेदिता सराफ यांनी मराठमोळा लूक करत कान्समध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. पण, अशोकमामांच्या एका कृतीने चाहत्यांची मनं जिंकून घेतली आहेत.
कान्स फेस्टिव्हलसाठी अशोक सराफ-निवेदिता सराफ यांनी मराठमोळा लूक केला होता. पांढऱ्या रंगाचा सूट आणि काळ्या रंगाची पँट असा लूक अशोक सराफ यांनी केला होता. तर निवेदिता सराफ पैठणी नेसून केसांत गजरा माळून दागिन्यांचा साज करत कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरल्या. त्यांना पाहताच क्षणी सगळेच आश्चर्यचकित झाले. रेड कार्पेटवर येताच अशोकमामांनी हात जोडत सगळ्यांना नमस्कार केला. त्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्यासोबत कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरदेखील सहभागी झाली आहे. रेड कार्पेटवर प्राजक्ताने नऊवारीमध्ये हजेरी लावत प्रेक्षकांची मनं जिंकली. तर अंकिताने कोकणाची संस्कृती तिच्या लूकमधून जपल्याचं दिसलं.