सोनाक्षीबरोबर पळून जाऊन लग्न करणार होता जहीर इक्बाल, पण...; लग्नानंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 12:16 IST2024-07-23T12:15:38+5:302024-07-23T12:16:05+5:30

सोनाक्षीने बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. आता लग्नानंतर सोनाक्षीबरोबर पळून जावून लग्न करणार होतो, असा खुलासा जहीरने केला आहे. 

zaheer iqbal revealed that he wanted to elope and get married with sonakshi sinha | सोनाक्षीबरोबर पळून जाऊन लग्न करणार होता जहीर इक्बाल, पण...; लग्नानंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा

सोनाक्षीबरोबर पळून जाऊन लग्न करणार होता जहीर इक्बाल, पण...; लग्नानंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काही दिवसांपूर्वीच लग्नबंधनात अडकली. सोनाक्षीने बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. आंतरधर्मीय विवाह केल्याने सोनाक्षीला ट्रोलही केलं गेलं होतं. शिवाय सोनाक्षीच्या लग्नाच्या निर्णयावर कुटुंबीय नाखूश असल्याच्याही चर्चा होत्या. आता लग्नानंतर सोनाक्षीबरोबर पळून जावून लग्न करणार होतो, असा खुलासा जहीरने केला आहे. 

सोनाक्षी आणि जहीरने नुकतंच गलाटा इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत सोनाक्षी-जहीरने लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल भाष्य केलं. सोनाक्षीने सांगितलं की तिला नेहमीच कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न करायचं होतं. त्यावर जहीरने सोनाक्षीला पळवून नेऊन लग्न करायचा प्लॅन होता असं सांगितलं. तो म्हणाला, "मला पळून जायचं होतं...परदेशात जाऊन लग्न करायचं आणि परत यायचं. पण, मला नंतर समजलं की भारतात अशा लग्नाला मान्यता दिली जात नाही". सोनाक्षीने हा प्लॅन कॅन्सल केल्याचंही जहीरने सांगितलं. 

सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. २३ जूनला लग्न करत त्यांनी आयुष्यभर एकमेकांबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. रजिस्टर पद्धतीने सोनाक्षी आणि जहीर लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर त्यांचं ग्रँड रिसेप्शन पार पडलं. याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. 

Web Title: zaheer iqbal revealed that he wanted to elope and get married with sonakshi sinha