अरबाज खानची रूमर्ड गर्लफ्रेंड शुरा खान आहे तरी कोण, जाणून घ्या नेमकं काय करते...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 06:32 PM2023-12-21T18:32:47+5:302023-12-21T18:40:02+5:30

सध्या अरबाज खान आणि त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड शूरा खान यांच्या लग्नाच्या बातम्याही वेग धरला आहे.​​

Who Is Arbaaz Khan's Rumored Girlfriend Shura Khan, Know What She Really Does | अरबाज खानची रूमर्ड गर्लफ्रेंड शुरा खान आहे तरी कोण, जाणून घ्या नेमकं काय करते...

अरबाज खानची रूमर्ड गर्लफ्रेंड शुरा खान आहे तरी कोण, जाणून घ्या नेमकं काय करते...

 अभिनेता आणि दिग्दर्शक अरबाज खानला वेगळ्या ओळखीची गरज नाही. अरबाज हा प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असतो.   सध्या अरबाज खान आणि त्याची रुमर्ड गर्लफ्रेंड शूरा खान यांच्या लग्नाच्या बातम्याही वेग धरला आहे. दोघेही लवकरच विवाह करणार असल्याचे म्हटले जात आहे. यातच ही मिस्ट्री गर्ल आहे तरी कोण याची चर्चा सुरु झाली आहे. 

शूरा खान एक व्यावसायिक बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट आहे. शुरा आणि अरबाज खानची 'पटना शुक्ला' चित्रपटाच्या सेटवर भेट झाल्याचे म्हटले जात आहे. बी-टाउन मेकअप आर्टिस्ट म्हणून ती प्रसिद्ध आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीची शूरा ही व्यावसायिक मेकअप आर्टिस्ट आहे. एवढेच नाही तर छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता हिचेही नाव शुराच्या सेलेब्स यादीत आहे.

शूरा खान सोशल मीडियावर फारशी सक्रिय नाही, याचा अंदाज तुम्ही तिच्या खासगी इंस्टाग्राम अकाउंटवरून सहज लावू शकता. अरबाज आणि शूरा लवकरच लग्न करणार असल्याच्याही बातम्या आहेत. इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अरबाज खान २४ डिसेंबरला पुन्हा एकदा बोहल्यावर चढणार आहे. पण, अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. 

अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी 1998 मध्ये लग्न केले होते. 19 वर्षांनंतर मलायका आणि अरबाज यांचा अधिकृत घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा असून नाव अरहान खान असे त्याचे नाव आहे. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून मलायका अरोरा ही अर्जुन कपूर याला डेट करत आहे. तर मलायका अरोरासोबत घटस्फोट झाल्यानंतर तो मॉडेल आणि अभिनेत्री जॉर्जिया अँड्रियानीला डेट करत होता. मात्र, जास्त काळ त्यांचे नाते टिकू शकले नाही. 

Web Title: Who Is Arbaaz Khan's Rumored Girlfriend Shura Khan, Know What She Really Does

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.