असे काय घडले असावे की, बॉबी देओलला नाइट सूटवरच काढावा लागला फोटो?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2017 02:51 PM2017-07-19T14:51:40+5:302017-07-19T20:21:40+5:30

मध्यंतरी चित्रपटांमधून गायब होऊन हलाखीचे जीवन जगणारा अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा त्याच्या करिअरच्या ट्रॅकवर परतला आहे. बॉबीचा नुकताच ...

What would have happened, that Bobby Deol had to be shot on a nightclub? | असे काय घडले असावे की, बॉबी देओलला नाइट सूटवरच काढावा लागला फोटो?

असे काय घडले असावे की, बॉबी देओलला नाइट सूटवरच काढावा लागला फोटो?

googlenewsNext
्यंतरी चित्रपटांमधून गायब होऊन हलाखीचे जीवन जगणारा अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा त्याच्या करिअरच्या ट्रॅकवर परतला आहे. बॉबीचा नुकताच एक फोटो समोर आला असून, त्यामध्ये त्याची हटके स्टाइल तरुणांना आकर्षित करणारी आहे. ‘दुनिया हसीनो का मेला’ या गाण्यातून आपली छाप सोडणारा बॉबी देओल त्यावेळी तरुणाईच्या गळ्यातील ताइत होता. त्याची हटके हेअर स्टाइल तरुणांना आकर्षित करणारी होती. आता पुन्हा एकदा बॉबी आपला जलवा दाखविण्यासाठी येत आहे. सनी देओल, श्रेयस तळपदेसोबतचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, फोटोमधील बॉबीच्या ड्रेसची सर्वत्र चर्चा रंगत आहे. 

एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप होत गेल्याने बॉबी देओल मधल्या काळात खूपच आर्थिक अडचणीत सापडला होता. असेही म्हटले जात होते की, तो नशेच्या आहारी गेला आहे. अशात आता बॉबी देओलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, तो यूथ आयकॉन म्हणून समोर येणार आहे. दरम्यान, समोर आलेल्या बॉबीच्या फोटोमध्ये तो पिवळ्या रंगाच्या नाइट सूटमध्ये दिसत आहे. त्याच्या फोटोकडे बघून असे वाटत आहे की, घरातून निघताना कपडे बदलणे तो विसरला असावा. सध्या बॉबी आणि सनी देओल श्रेयस तळपदेच्या ‘पोस्टर बॉय’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हे तिघेही चित्रपटाचे प्रमोशन करताना एकत्र आले होते. 

‘पोस्टर बॉय’ हा मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. याच नावाने हा चित्रपट २०१४ मध्ये मराठीत आला होता. आता त्याचा हिंदी रिमेक बनविण्यात येत असून, श्रेयस तळपदे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. चित्रपटात सनी देओल, बॉबी देओल आणि श्रेयस भूमिका करणार आहेत. मराठीत आलेला ‘पोस्टर बॉय’ कॉमेडीपट असल्याने, हिंदीतील पोस्टर बॉयदेखील याच धर्तीवर आधारित असेल असा कयास चाहत्यांकडून लावला जात आहे. दरम्यान, बॉबी पुन्हा एकदा फिल्मी करिअरकडे परतला असल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षक कितपत स्वीकारतील हे येत्या काळात स्पष्ट होईलच.

Web Title: What would have happened, that Bobby Deol had to be shot on a nightclub?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.