अमिताभ यांचा फोटो पाहताच अशी झाली होती रेखा यांची अवस्था,एकदा पाहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 10:58 IST2019-10-11T10:52:40+5:302019-10-11T10:58:37+5:30

खास मीडियाला फोटो देण्यासाठी एका जागी उभ्या राहतात. त्याचवेळी त्या पाठीवळून पाहतात तर तिथे अमिताभ यांचा फोटो लावलेला दिसतो.

Watch: Rekha's reaction after she poses in front of Amitabh Bachchan's photo | अमिताभ यांचा फोटो पाहताच अशी झाली होती रेखा यांची अवस्था,एकदा पाहा हा व्हिडीओ

अमिताभ यांचा फोटो पाहताच अशी झाली होती रेखा यांची अवस्था,एकदा पाहा हा व्हिडीओ

जेव्हा -जेव्हा रेखा यांचा विषय येतो तेव्हा -तेव्हा अमिताभ यांचा रेखा यांच्याशी असलेला सिलसिला नाही आठवला तरच नवल. एकदा फोटोग्राफर डब्बु रत्नानीच्या कॅलेंडर लॉन्चवेळी वेगवेगळ्या बॉलिवूड सेलिब्रेटींनी आपल्या खास स्टायलिश अंदाजात हजेरी लावली होती. मात्र या सा-यांमध्ये लक्ष वेधून घेतले ते रेखा यांनी. व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये  डब्बु रत्नानी यांच्या बच्चेकंपनीसह मस्त फोटो काढण्यात व्यस्त दिसत आहे. हे झाल्यानंतर त्यांनी खास मीडियाला फोटो देण्यासाठी एका जागी उभ्या राहतात. त्याचवेळी त्या  पाठीवळून  पाहतात तर  तिथे अमिताभ यांचा फोटो लावलेला दिसतो. अमिताभ यांचा फोटो पाहताच रेखा यांनी क्षणाचाही विलंब न लावता आश्चर्यचकीत होत तिथून काढता पाय घेतात.

 

अमिताभ यांचा फोटो पाहून थबकलेल्या रेखा यांची ही गोंधळलेली अवस्था मात्र मीडियाच्या कॅमे-यात कॅप्चर झाली होती. तेव्हा  रेखा यांचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला  होता. व्हीडीओ पाहून नेटीझन्स मात्र आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत दिसले. एका युजरने म्हटले होते की, हा व्हीडीओ जरा जया बच्चन यांनाही दाखवा.  या व्हीडीओमुळे पुन्हा एकदा प्रत्यक्षरित्या-अप्रत्यक्षरित्या अमिताभ-रेखाचा सिलसिला संपला नाही तर तो सुरुच असल्याचे पाहायला मिळाले. 
 

Web Title: Watch: Rekha's reaction after she poses in front of Amitabh Bachchan's photo