अंगावर शहारे आणणारा स्पाय थ्रिलर 'खुफिया'चा ट्रेलर प्रदर्शित; तब्बू-अली फजल जोडीने उडवली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 01:28 PM2023-09-18T13:28:44+5:302023-09-18T13:30:01+5:30

विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'खूफिया'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.

vishal bhardwaj's spy thriller 'khufiya' trailer released | अंगावर शहारे आणणारा स्पाय थ्रिलर 'खुफिया'चा ट्रेलर प्रदर्शित; तब्बू-अली फजल जोडीने उडवली खळबळ

khufiya

googlenewsNext

विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'खूफिया'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक उत्सुक होते.   'खुफिया' OTT प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर  ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटाची घोषणा होताच पात्रांची पहिली झलक दाखवण्यात आली होती. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा रंगली आहे.


'खुफिया' चित्रपटात तब्बू, अली फजल आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे तब्बू मोठ्या पडद्यानंतर पुन्हा एकदा ओटीटीवर खळबळ माजवणार आहे.  विशाल भारद्वाज दिग्दर्शित खुफिया हा चित्रपट अमर भूषण यांच्या 'एस्केप टू नोव्हेअर' या पुस्तकावर आधारित आहे. या चित्रपटात तब्बू एका गुप्तहेराच्या भूमिकेत पाहायला मिळते. या मोहिमेत तब्बूला भारताचे सिक्रेट विकणाऱ्या गुप्तहेराचा शोध घेण्याचं काम दिलं आहे.

रॉ एजंटची भूमिकेबाबत तब्बू म्हणाली, “आवडत्या दिग्दर्शकासोबत पुन्हा एकदा काम करताना खूप आनंद होतोय. हैदर आणि मकबूलनंतर आम्ही पुन्हा तिसऱ्यांदा एकत्र काम करतोय. विशालचा दृष्टीकोन आणि कथानकाने मला नेहमीच भुरळ घातली आहे". तर दिग्दर्शक विशाल भारद्वाज म्हणाले की, “मला हेरगिरीच्या जगाने नेहमीच भुरळ घातली. खुफियामुळे तब्बू, अली फजल आणि वामिका गब्बी या अतिशय प्रतिभावान कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळाली. 
 

Web Title: vishal bhardwaj's spy thriller 'khufiya' trailer released

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.