विराट कोहलीच्या 'लाइक' वादात एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया समोर, म्हणाली, "१२ वर्ष झाली तरी अजून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 09:44 IST2026-04-22T09:44:21+5:302026-04-22T09:44:50+5:30
एका जर्मन व्लॉगरच्या फोटोला लाईक केल्यामुळे विराट कोहली हा चर्चेत आला आहे.

विराट कोहलीच्या 'लाइक' वादात एक्स गर्लफ्रेंडची प्रतिक्रिया समोर, म्हणाली, "१२ वर्ष झाली तरी अजून..."
Virat Kohli Like Controversy : क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आला आहे. आधी अवनीत कौरची फोटो लाईक केल्यावरुन तो चांगलाच ट्रोल झाला होता. 'इन्स्टाग्राम अल्गोरिदमचं कारण त्याने दिलं होतं. तर आता त्याने एका जर्मन मॉडेलचे फोटो लाईक केले आहेत. याचा स्क्रीनशॉट वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला. या घटनेवर विविध प्रतिक्रिया उमटल्या. या सगळ्यात विराटची एक्स गर्लफ्रेंड ब्राझिलियन अभिनेत्री इसाबेल लीट हिचंही नाव ओढलं गेलं. यावर इसाबेल लीटनं संताप व्यक्त केला आहे.
विराटने जर्मन इन्फ्लुएन्सर लिजलैज (Lizlaj) हिचा फोटो लाईक केल्यानंतर एका इन्स्टाग्राम पेजने या वादात भर घालताना विराटची पत्नी अनुष्का शर्मा, जर्मन व्लॉगर लिझलाझ, अभिनेत्री अवनीत कौर आणि विराटची माजी प्रेयसी इसाबेल लेइटी यांचे फोटो एकत्र पोस्ट केले. या पोस्टला "विराट कोहलीची महिलांच्या बाबतीतली निवड अगदी 'एलिट' आहे" असे कॅप्शन देण्यात आले. तसेच, "इसाबेल लीटपासून अनुष्का शर्मापर्यंत… त्याची आवड ही त्यांच्या ब्रँडचा भाग आहे" असंही नमूद करण्यात आलं.
या पोस्टवर प्रतिक्रिया देताना इसाबेल लीट हिनं 'थकलेल्या चेहऱ्याचा' इमोजी कमेंट केला. तिनं लिहिलं, "या गोष्टीला १२ वर्षं झाली आहेत, तरीही हे अजून सुरूच आहे. लोक हे सगळं विसरून पुढे का जाऊ शकत नाहीत?".

कोण आहे विराटची एक्स गर्लफ्रेंड?
माहितीनुसार, विराट कोहली आणि इसाबेल लीटयांनी २०१२ ते २०१४ दरम्यान एकमेकांना डेट केलं होतं. सध्या इसाबेल लीट विवाहित असून ती आपल्या पती आणि दोन मुलांसोबत कतारमधील दोहा येथे स्थायिक आहे.इजाबेलला शेवटचं २०१९ मधील 'मिस्टर मजनू' आणि २०२० मध्ये 'वर्ल्ड फेमस लव्हर' या चित्रपटांमध्ये पाहण्यात आलं होतं. सध्या तिने कोणत्याही नव्या प्रोजेक्टची घोषणा केलेली नाही.