वरूण धवन आणि नताशाच्या लग्नाची संपूर्ण डिटेल्स वाचा एका क्लिकवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2020 13:30 IST2020-01-27T13:17:16+5:302020-01-27T13:30:16+5:30
Varun Dhawan And Natasha Dalal's Wedding : वरूण आणि नताशा डेस्टिनेशन वेडिंग करणार आहेत.

वरूण धवन आणि नताशाच्या लग्नाची संपूर्ण डिटेल्स वाचा एका क्लिकवर!
अभिनेता वरूण धवनचा सिनेमा 'स्ट्रिट डान्सर 3 डी' सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे. तर दुसरीकडे वरुण धनवच्या लग्नांचा चर्चांना जोर धरला आहे. वरूण आणि नताशा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार वरूण आणि नताशा मे महिन्यात लग्न करण्याचे प्लॅनिंग करतायेत. डेस्टिनेशन वेडिंग ते करणार आहेत. एक भव्य लग्न नताशा आणि वरूण करणार आहेत. लग्न एक आठवडा चालणार आहे. यात मेहंदी, संगीत आणि रिसेप्शनचा समावेश आहे. गोव्यातल्या एका बीच रिसोर्टवर लग्न होणार आहे. अजून लग्नाच्या तारखेबाबत कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र रिपोर्टनुसार मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात लग्न करण्याची शक्यता आहे.
24 एप्रिलला वरूणच्या वाढदिवसाच्या दिवशी तो लग्नाच्या तारखेची घोषणा करण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार हे लग्न गोव्यातील बीच रिसोर्टला किंवा एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होईल. काही बॉलिवूड सेलिब्रेटींनादेखील त्यांच्या तारख्या रिझर्व्ह करुन ठेवायला सांगण्यात आल्या आहेत. वरूणच्या लग्नात सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम, करण जोहर, अनिल कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि सलमान खान यासारख्या अनेक कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
वर्कफ्रंटबाबात बोलायचे झाले तर वरूणचा 'कुली नंबर १' १ मे, २०२० रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.गोविंदा व करिश्मा कपूर यांचा कुली नंबर १ चित्रपटाचा हा रिमेक आहे. यात या दोघांची जागा वरूण धवन व सारा अली खानने घेतली आहे. हे दोघे रिमेकसाठी खूप उत्सुक आहेत. गोविंदा व करिश्मा कपूर यांचा कुली नंबर १ चित्रपटाचा हा रिमेक आहे. यात या दोघांची जागा वरूण धवन व सारा अली खानने घेतली आहे. हे दोघे रिमेकसाठी खूप उत्सुक आहेत