उर्वशी रौतेलाच्या 'JNU' चित्रपटात मराठमोळा अभिनेता झळकणार; 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 15:14 IST2024-03-12T15:13:01+5:302024-03-12T15:14:36+5:30

उर्वशी रौतेलाबरोबर मराठी अभिनेता करणार काम, JNU सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

uravshi rautela Jnu movie poster release marathi actor siddharth bodke to play important role | उर्वशी रौतेलाच्या 'JNU' चित्रपटात मराठमोळा अभिनेता झळकणार; 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

उर्वशी रौतेलाच्या 'JNU' चित्रपटात मराठमोळा अभिनेता झळकणार; 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला कायमच चर्चेत असते. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केल्यानंतर उर्वशी आता नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'JNU(जेएनयू)' या सिनेमाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या सिनेमात उर्वशी रौतेला मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. उर्वशीने तिच्या सोशल मीडियावरुन सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. 

'JNU - जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी' असं उर्वशीच्या नव्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये एका हातात भाराताचा नकाशा दिसत आहे. त्यावर "एक शैक्षणिक संस्था देशाला अस्वस्थ करू शकते?" असं लिहिलेलं दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत उर्वशीने "शिक्षणाच्या बंद दरवाजाआड देशाला अस्वस्थ करण्यासाठी कट शिजतो. जेव्हा डावी आणि उजव्या विचारसरणीमध्ये टक्कर होते, तेव्हा वर्चस्वाची लढाई कोण जिंकतं?" असं कॅप्शन दिलं आहे. 

उर्वशीच्या या सिनेमात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही झळकणार आहे. सिद्धार्थने काही दिवसांपूर्वीच उर्वशीबरोबर शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला होता. आता त्याने सिनेमाचं पोस्टर शेअर करत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. JNU सिनेमात सिद्धार्थ कोणती भूमिका साकारणार याबाबत अजून त्याने खुलासा केलेला नाही. पण, त्याला उर्वशीबरोबर सिनेमात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

उर्वशी रौतेला मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन विनय शर्मा यांनी केलं आहे. तर प्रतिमा दत्ता यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. ५ एप्रिलला 'JNU - जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी'सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: uravshi rautela Jnu movie poster release marathi actor siddharth bodke to play important role